वाहतूक कोंडी, रायगड  हाऊसफुल्ल 

0
1204

अलिबागः रायगड जिल्हयातून जाणार्‍या मुंबई-गोवा,मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या तीनही महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीं झाल्याने सुटीसाठी कोकणात किंवा पुण्याला जाणार्‍या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजिक प्रचंड कोंडी झाली असून वडखळ ते पेण या रस्त्यावर दुतर्फा कोंडी झाली आहे.रस्त्यांची सुरू असलेली कामं,रस्तयावर पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळं ही कोडी झाली असल्याचे सांगितले जाते.वडखळवरून पुढे अलिबागला जाणार्‍या रस्त्यावरची वाहतूकही धिम्या गतीनं सुरू आहे.मुूंंबईकडून पुण्याकडं जाणार्‍या लेनवरही प्रचंड कोंडी झालेली आङे त्यामुळं पुण्याकडून मुंबईकड येणार्‍या लेनपैकी दोन लेनवरून पुण्याकडं जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.बोरघाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.उद्या नाताळ असल्याने आणखी दोन दिवस अशीच स्थिती असेल अशी शक्यता आहे.दरम्यान रायगड जिल्हयातील सर्वच समुद्र किनारे गर्दीनं फुलून गेले आहेत.अलिबाग,काशीद,मुरूड जंजीरा,हरिहरेश्‍वर किनार्‍यांवर तसेच रायगड किल्ययावर पर्यटकांची मोठीच गर्दी झालेली आहे..-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here