सरकार उदार झाले..

0
752

सरकार उदार झाले…
पत्रकार पुरस्कारांच्या रक्कमेत प्रत्येकी दहा हजारांची वाढ

महाराष्ट्र सरकारच्यावतीने पत्रकारांसाठी देण्यात येणार्‍या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराच्या रक्कमेत आज एका शासन निर्णयाव्दारे प्रत्येकी दहा हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे.महाराष्ट्र सरकारच्यावतीने एकूण 17 पुरस्कारांसाठी प्रत्येकी 41 हजार रूपयांची रक्कम दिली जात होती.आता यामध्ये दहा हजारांची वाढ करण्यात आली असून ती यापुढे 51 हजार करण्यात आली आहे.

शासनाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार
अनंत गोपाळ शेवडे (इंग्रजी ,राज्यस्तर )
बाबूराव विष्णू पराडकर ( हिंदी ) राज्यस्तर
यशवंतराव चव्हाण ( शासकीय गट ) राज्यस्तर
पु,ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार ( राज्यस्तरीय)
केकी मुस उत्कृ ट छायाचित्र पुरस्कार ( शासकीय गट)
सोशल मिडिया पुरस्कार ( राज्यस्तर )
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार ,राज्यस्तर
दादासाहेब पोतनीस पुरस्कार ( नाशिक विभाग)
अनंत भालेराव पुरस्कार ( औरंगाबाद)
आचार्य अत्रे पुरस्कार ( मुंबई विभाग)
नानासाहेब परूळेकर पुरस्कार ( पुणे विभाग )
शि.म.परांजपे पुरस्कार ( कोकण विभाग)
ग.गो.जाधव पुरस्कार ( कोल्हापूर विभाग)
लोकमान्य बापूजी अणे ( अमरावती)
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार ( नागपूर विभाग )
वरील सर्व पुरस्कारांच्या रक्कमा 41 वरून 51 हजार करण्यात आल्या आहेत.
विकास योजना,त्याची अंमलबजावणी,अंमलबजावणी प्रक्रियेत लोकसहभाग,या बाबी जनतेपर्यंत पोहोचविणार्‍या पत्रकारांना हे पुरस्कार दिले जातात.मात्र या पुरस्कारांची योग्य पध्दतीने जाहिरात होत नाही.त्यामुळे पत्रकारांकडून पुरस्कारांना फारसा प्रतिसाद मिळत नाही हे वारंवार दिसून आलं आहे.शिवाय अशा काही घटना घडल्या आहेत की,निवड समितीत असलेल्यांनी आपल्या दैनिकांच्या पत्रकारांना पुरस्कार दिल्याच्या काही घटना समोर आलेल्या आहेत.
( ताजा कलम ः आमच्यामुळेच या रक्कमेत वाढ झाली आहे असा दावा करीत याचे श्रेय  तत्सम कोणाला घ्यायचे असेल तर आमची हरकत नाही.  )
आमची भूमिका
पुरस्कारांच्या रक्कमेत वाढ केली असेल तर तिचे स्वागत.मात्र किरकोळ गोष्टी पत्रकारांच्या माथी मारत पेन्शन किंवा कायदयाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे.सरकार या पुरस्कारावर 8 लाख 67 हजार रूपये दरवर्षी खर्च करीत असते. )

( पहा जीआर मावज 2016 / प्र.क्र.  / 238 /  का 34 दिनांक 28 सप्टेंबर 2016 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here