शोभना देशमुख यांना आकाशवाणीचा राष्ट्रीय पुरस्कार

    0
    783

    मुंबई- आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार यंदा शोभना देशमुख यांना जाहीर झाला आहे.2012साठीचा हा पुरस्कार असून या पुरस्कारासाठी निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव वार्ताहर आहेत..आकाशवाणीच्या देशभरातील वार्ताहरांमधून या पुरस्कारासाठी निवड केली जाते.शोभना देशमुख यांची आकाशवाणीच्या पश्चिम विभागातून निवड केली गेली आहे.लवकरच होणाऱ्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल.श्रीफळ,मानपत्र,स्मृतीचिन्ङ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.दरवर्षी देशातील वेगवेगळ्या महानगरात पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम होतात.

    वृत्तपत्रविध्या अभ्यासक्रमाची पदविका संपादन केलेल्या शोभना देशमुख या गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत आहेत.सोलापूर तरूण भारतमध्ये उपसंपादक म्हणून पत्रकारितेला सुरूवात केल्यानंतर त्यांनी सोलापूरसाठी सामनाचे प्रतिनिधी म्ङणून काम केले होतें. त्यानंतर सामना, लोकमत,नवभारत,सा.चित्रलेखा आदि वृत्तपत्रांसाठी रायगड प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे.त्यांना यापुर्वी समर्थनचा मानवी हक्का वार्ता पुरस्कार,महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार,सुभाष दोंदे स्मृती पुरस्कार, लोकमतचा पा.वा.गाडगीळ स्मृती पुरस्कार मिळालेला आहे.महाविद्यालयीन जीवनातही त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
    अलिबाग येथे मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या अभ्यासकेंद्रात त्यांनी सहा वर्षे अध्यापनाचे कार्य े केले असून आकाशवाणीसाठी त्यांनी विविध विषयावर कार्यक्रम सादर केलेले आहेत.तसेच त्यांचे विविध विषयावर अनेक मान्यवर दैनिकात लिखाण प्रसिध्द झाले आहे.गेली बारा वर्षे महिलांसाठी वाहिलेल्या मुक्ता दिवाळी अंकाचे संपादनही त्या करतात.साप्ताहिक उद्याचा बातमीदारचे संपादन आणि बातमीदार या न्यूज पोर्टलची संपादकीय जबाबदारी त्या साभाळतात . 2003 पासून त्या आकाशवाणीसाठी रायगडच्या  वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here