शिवसेनेला संजीवनी

0
542

नारायण राणेंचे वक्तव्य सेनेच्या पथ्यावर

मुख्य मंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य निश्चितपणे शिवसेनेच्या पथ्यावर पडलेलं आहे.. शिवसेना राज्यात सत्तेवर असली तरी गाव पातळीवर शिवसेनेचे अस्तित्व कुठे दिसत नव्हते.. शिवसेनेकडे विशेष कोणता कार्यक्रम नव्हता.. अन पक्ष सत्तेत असल्यानं जनहिताच्या प्रश्नावर आक़मक होऊन रस्त्यावर येण्याची सोय उरली नव्हती.. पदाधिकरयांचा निवडीवरून देखील जिल्ह्याजिल्ह्यात जोरदार गटबाजी सुरू होती.. या सर्वांचा फटका निश्चितपणे पक्ष संघटनेला बसत होता.. त्यातच नारायण राणे शिवसेनेवर आणि पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करीत होते, मुख्यमंत्री गेला उडत अशी खालच्या पातळीची भाषा वापरत होते, निलेश आणि नितेश हे राणे पुत्र दररोज ट्विट करून उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करीत होते.. तरीही त्यांना कोणी प्रत्युत्तर देत नव्हते.. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर नारायण राणे यांना येऊ देणार नाही असं बोलणारे शिवसेना नेते प्रत्यक्षात राणे यांना रोखू शकले नाहीत.. याचा नकारात्मक परिणाम शिवसैनिकांवर होत होता.. शिवसेना आणि पहिल्यासारखी आक़मक राहिली नाही, कोणीही येतो आणि सेनेला चपली मारून जातो अशी भावना सामांन्य शिवसैनिकांची झाली होती.. उध्दव साहेब हे सारं खपवून का आणि कसे घेतात? असा प्रश्न सामांन्य शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाला होता.. अनेक शिवसैनिकांनी पक्ष प़मुखांची मुळमुळीत भाषा ही पसंत नव्हती.. मात्र ते हतबल होते.. या हतबलतेतून शिवसैनिकांच्या मनात नैराश्य निर्माण झालं होतं.. पक्ष संघटनेत शैथिल्य आलं होतं.. नारायण राणे यांचे वक्तव्य आणि त्यानंतर पक्षानं घेतलेल्या आक़मक भूमिकेमुळे मरगळ झटकून रस्त्यावर येण्याची उर्मी शिवसैनिकांना मिळाली आहे.. माझ्या बंगल्याखाली येऊन दाखवा असे आव्हान राणे पुत्रांनी दिल्यानंतर ते आव्हान स्वीकारत पहिल्यांदाच युवा सेनेचे हजारो कार्यकर्ते हातात दगड घेऊन राणे यांच्या बंगल्यावर गेले.. हे दृश्य टिव्हीवर पाहिल्यानंतर गावागावातले सैनिक रस्त्यावर आले आणि पहिल्यांदाच कॅमेरासमोर येऊन नारायण राणेंचा जाहीर उद्धार करू लागले.. राणे यांनी केलेले वक्तव्य राज्यातील सामांन्य माणसाला देखील रूचले नाही.. जनसामान्य आपल्या बाजुने आहे हे पाहून सेनेचे सारेच नेते राणेंवर टीका करू लागले.. या स्थितीत राणे यांच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतः ला दूर ठेवले.. त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय देखील नव्हता.. राणेंनी केलेले वक्तव्य आम्हाला मान्य नाही पण त्यांच्यावर कारवाई निषेधार्थ आहे अशी कातडीबचाव भूमिका भाजपला घ्यावी लागली.. प्रसाद लाड यांच्यासारख्या आचपेच नसलेल्या नेत्याची वायफळ बडबड सोडली तर भाजप आज दिवसभर बॅकफूटवर गेल्याचे दिसले.. राणे आणि भाजपला न्यायालयांनी ही दिलासा दिला नाही.. रत्नागिरीचे जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयातही राणेंनी अपयश आल्याने भाजप नेत्यांना नेमकं काय बोलावं तेच कळत नव्हतं… या सारया नाट्याचा आपल्याला फटका बसणार याची जाणीव भाजपला झाल्याशिवाय राहिली नाही.. त्यातच पक्षातले जे निष्ठावान आहेत ते पक्षात आलेली ही राडा संस्कृती पाहून फार आहेत असंही नाही..
नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले अनुकूल वातावरण असेच कायम राहावे यासाठी सेनेचा आता राहिल.. अशा वातावरणातच सेना आता महापालिका निवडणुकीना सामोरं जाऊ शकते.. त्यासाठी नारायण राणे यांच्या प़त्येक आरे ला शिवसेना कारे ने उत्तर देईल… हे आता नक्की झालंय.. महापालिका निवडणुकीत नारायण राणे यांचा काही उपयोग होत नाही असे दिसताच भाजप देखील नारायण राणे यांची उपेक्षा करताना दिसेल.. हे नक्की..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here