‘विहित नमुना’ प्रकरणी ,महासंचालक लक्ष घालणार

0
807

अधिस्वीकृती समितीमधील एकाधिकारशाही आणि नियमभंगासंदर्भातली पोस्ट काल प्रसिध्द झाल्यानंतर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे कर्तव्यकठोर महासंचालक श्री.ब्रिजेशसिंग यांनी त्याची तातडीने दखल घेत याप्रश्‍नी लक्ष घालण्याचे आश्‍वासन एस.एम.देशमुख यांना दिले आहे.अर्ज विहित नमुन्यात नाही या सबबीखाली कोल्हापूर बैठकीत अनेकांचे अर्ज फेटाळण्यात आले.वस्तुतः ज्येष्ठ पत्रकारांसाठी अर्ज कोर्‍या कागदावरच करावा असे नियमांत असताना हा विहित नमुन्यातील फॉर्मुला आणून अनेक पत्रकारांची कोंडी केली गेली.तो विहित नमुना आजही जिल्हा माहिती कार्यालयाकडे उपलबध्द नसल्याने सर्वत्र संभ्रवावस्था असून नेमके काय करायचे याच्या कोणत्याही सूचना माहिती अधिकार्‍यांना नाहीत.त्यामुळे कोर्‍या कागदावर आलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत आणि विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध नाहीत असा प्रकार सुरू आहे.ही बाब काल एस.एम.देशमुख यांनी दुरध्वनीच्या माध्यामातून नवे महासंचालक ब्रिजेशसिंग यांच्या कानावर घातली आणि ही कोंडी फोडण्याची विनंती त्यांना केली.त्यांनी लक्ष घालण्याचे आणि ज्येष्ठ पत्रकारांची अडचण होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्‍वासन दिले आहे.तसेच अधिस्वीकृती समितीला कोणतेही नियम करण्याचे अधिकार नसताना मनमानीपणे ही समिती नियम करीत आहे,याकडेही महासंचालकांचे लक्ष वेधले त्यावरही आपण लक्ष घालू असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.महासंचालकांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले आहे.बिजेशसिंग यांनी महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक सकारात्मक बदल विभागात दिसू लागले असून विबागातील काही अधिकार्‍यांची कंपूशाही संपुष्टात आली आहे.विभागात शिस्त दिसू लागल्याने मराठी पत्रकार परिषदेने या बदलाचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here