प्रिन्ट मिडियाला काही भवितव्य आहे काय? प्रिन्ट मधील मंडळींना दिलासा देण्यासाठी अनेक जण ‘हो अजून पन्नास वर्षे तरी प्रिन्टला मरण नाही’ असं या प्रश्नाचं उत्तर देत असले तरी वस्तुस्थिती तशी नक्कीच नाही.इलेकटॉनिक आणि सोशल मिडियाचं आक्रमण हे तर त्याचे एक कारण आहेच त्याचबरोबरच सरकारी धोरणही प्रिन्ट मिडियाला पूरक किंवा पोषक नाहीत. प्रिन्ट च्या जाहिरातींचा मोठा वाटा इलेक्ट्रॉनिक मिडियानं पळविला आहे. फारच थोडा वाटा प्रिन्टकडं राहिला आहे..हा वाटा देखील मोठी आणि भांडवलदारी पत्रेच लाटतात. त्यामुळं छोटया वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत सरकारनं या पत्रांकडं सहानुभूतीने पाहणे आवश्यक असताना डीएव्हीपीने प्रिन्ट चा गळा घोटायला सुरूवात केली आहे. अनेक वृत्तपत्रे डीएव्हीपीने सरकारी जाहिरात यादीवरून काढली आहेत. पुढील काळात आणखी काही पत्रांच्या मानगुटीवर तलवार चालविली जाणार आहे. केंद्राने ही भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारही मागे राहिलेले नाही. राज्य सरकारने अगोदर ३५० वृत्तपत्रांना यादीवरून काढून टाकले. आता आणखी ७००वृततपत्रांना नोटिसा पाठविल्या गेल्या आहेत. म्हणजे छोट्या मोठ्या 1200 वृत्तपत्रांच्या कायाॅलयांना टाळे लागणार आहे. जे या झंझावातात टिकतील ते ही सुखानं जगू शकतील असं अजिबात नाही.. अशा प्रतिकूल वातावरणात वडवणी सारख्या सवाॅथाॅनं अविकसित आणि मागास भागात एक साप्ताहिक सुरू करणे आणि ते अखंडपणे तीन वर्षे चालविणे ही बाब वाटते तेवढी सोपी नाही. पत्रकारितेची कोणतीही पाश्र्वभूमी नाही, कोणताही भक्कम आधार नाही..आणि आर्थिक पाठबळही नाही अशा स्थितीत निष्ठेनं एखादे साप्ताहिक चालविणे अधिकच कठीण असते. तीन वर्षांपूर्वी अनिल वाघमारे यांनी हे धाडस केले आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी डोंगरचा राजा चे तीन वषाॅपूवीॅ लावलेले रोपटे चांगलेच बाळसे धरू लागले आहे. पत्रकारितेवरील अतूट निष्ठा, कठोर परिश्रम आणि सवॅ स्तरातील लोका़बरोबरचे सौहार्दपूर्ण संबंध यामुळेच ते अशक्य ते शक्य करू शकले. 
चिखलबीडहून वडवणीस आल्यानंतर अनेक छोटी मोठी कामं त्यांनी केले. तहसिलमधषे बॉंडविक़ीचे काम करीत असतानाच अनिल वाघमारे यांनी लोकप़शनचया माध्यमातून पत्रकारिता सुरू केली. तब्बल दहा बारा वर्षे लोकप़शनसाठी वडवणी प़तिनिधी म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, वडवणी तालुक्यातील प्रश्नांना खरया अथाॅनं न्याय द्यायचा असेल तर आपल्या गावचे पत्र असले पाहिजे. वडवणी तालुक्याचे प्रश्न, येथील जनतेची सुख. दु:ख, लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे असं त्यांना दोन तीन वर्षे वाटत होतं. परंतू आर्थिक नियोजन होत नसल्यानं तेधाडस करू शकत नव्हते. अखेर अनेक मित्रांचा आग्रह, मदत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी डो़गरचा राजाचे शिवधनुष्य उचलले.. सुदैवानं आलेल्या अडचणींवर मात करीत त्यांनी हे शिवधनुष्य समथ॓पणे पेलले. डोंगरचा राजा आज खरया अथाॅनं वडवणी तालुक्यातील वाचकांच्या मनावर राज्य करतो आहे. दर रविवारी येणारया डोंगराच्या राजाची वाचक प्रतिक्षा करतात ही बाब खरोखरच कौतूकास्पद म्हटली पाहिजे. कारण आज व्हॉटसअ‍ॅपचा जमाना आहे.. कोणत्याही बातमीसाठी आठ दिवस वाट पहायची कोणाची तयारी नाही. तरीही वडवणी तालुक्याच्या राजकारणावर नेमकेपणाने भाष्य करणारया बातम्या, आकषॅक शिष॓क आणि तेवढीच आकषॅक मांडणी यामुळे वडवणीकरांची आठ दिवस प्रतिक्षा करण्याचीही तयारी असते. गेल्या तीन वषा॓त डो़गरचा राजाने वडवणी तालुक्याच्या जिव्हाळ्याचे अनेक प़शन हाताळले, लोकांना न्याय मिळवून दिला. अन्याय अत्याचाराच्या विरोधातही त्यांनी आवाज उठविला.. तालुक्यातील शेतकरयांचे प्रश्न, पाणी टंचाई सारख्या समस्या, रस्त्याचे प्रश्न हे सारे प्रश्न डोंगरचा राजानं अग्क़क़माने मांडले आणि आपले सामाजिक उत्तरदायित्व समथ॓पणे निभावले. त्यामुळे प्रत्येकाला डो़गरचा राजा हक्काचा साथी वाटतो.. आपल्याला कोठे न्याय मिळाला नाही तर डोंगरचा राजा नक्की न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्यात राजा यशस्वी झाला आहे.. आणि डो़गरचा राजा ची तीच मोठी शक्ती आहे असं मला वाटतं.
त्रकारांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आज सवा॓त कळीचा मुद्दा बनलेला आहे.. मात्र अनिल वाघमारे आणि डोंगरचा राजानं लोकांचा विश्वास मिळविला ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी डोंगरचा राजा नियमित वाचतो.. परंतू एखाद्या बातमी बद्दल माफी मागण्याची वेळ अनिल वाघमारे यांच्यावर कधी आली नाही.. बातमीचा खुलासा छापण्याची वेळही त्यांच्यावर आली नाही.. पुढील अंकी वाचा अशी चौकटही मला कधी दिसली नाही. पत्रकारितेतील सारी पथ्ये पाळून एक आदर्श अंक काढण्याचा प्रयत्न अनिल वाघमारे करीत आहेत. त्यांना सवाॅची साथ मिळाली पाहिजे.. डोंगरचा राजानं प्रिन्ट बरोबरच वेबजनाॅलिझममधयेही पदार्पण केलं आहे.. डोंगरचा राजा या पोटॅल ला भेट देणारया वाचकांची संख्या देखील वाढत आहे. वडवणी सारख्या एका छोट्या शहरातूनही एक चांगला अंक काढता येतो हे अनिल वाघमारे यांनी सिध्द केलं आहे. एक मित्र म्हणून आम्हाला त्यांचा साथॅ अभिमान आहे..
वधाॅपनदिनिदनािममिकत डोंगरचा राजा आणि संपादक अनिलराव यांना कोटी कोटी शुभेच्छा..
*एस. एम.देशमुख*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here