“लाॅंगमार्च”नं रस्तापूर्तीचं पत्रकाराचं स्वप्न जवळ आणलं..

0
788

रायगडमधील पत्रकार आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले.विषय तोच होता,मुंबई-गोवा महामार्गच्या ;चौपदरीकरणाचा..उरणपासून पोलादपूरपयर्तचे तीनशेवर पत्रकार लाॅंगमाचर्मध्ये सहभागी झाले होते.यावेळच्या आंदोलनाचं वेगळेपण असं की,पत्रकारांच्या या लढ्यात प्रथमच वेगवेगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती .२००८पासून चौपदरीकरणाच्या मागणीसाठी आम्ही लढतो आहोत पण हा सारा लढा तटस्थपणे पाहणाऱ्या राजकारण्याना अाज अचानक झालेली उपरतीपाहून उपस्थित पत्रकारांना नक्कीच आश्चयर् वाटले.दोन दिवसांपुवीर् निलेश राणे यांनी पालीत “चौपदरीकऱणाची मागणी आम्ही आक्रमकपणे माडणार” असल्याचे जाहीर केले.त्यानंतर आज आमच्या लाॅंगमाचर्मध्ये शेकापचे स्थानिक आमदार धैयर्शील पाटील सहभागी झाले.राष्ट्रवादी,शिवसेना आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारीही हजेरी लावून गेले.काॅग्रेसचे वैकुंठ पाटीलही येऊन गेले.कळत नव्हतं या नेत्यांना अचानक काय झालं ते.? एक पत्रकार मित्र म्हणाला,”आता काम सुरूय श्रेय लाटण्यासाठी आणि आमच्यामुळंच रस्त्याचं काम मागीर् लागलं असं भासविण्यासाठी पुढारी  सहभागी झाले आहेत”.खरंच तसं असेल तर रायगडमधील राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या टायमिंग साधण्याच्या योजकतेला सलामच करावा लागेल.आमच्या पुरते सांगायचे तर आम्ही श्रेयासाठी  ही लढाई लढलीच नाही.श्रेय ज्याला घ्यायचंय त्यानं घ्यावं. आम्हाला रस्ता हवाय . मात्र .श्रेया च्या नादात   राजकारणी मंडळीने आमचं आंदोलनचं हायजॅक केले नाही म्हणजे मिळवली .

वडखळ ते पेण हे अंतर अाठ किलो मिटर आहे.आज पाऊस पडेल म्हणून सारेच छत्र्या सावरत आले होते पण दिवसभर कडक उन्ह पडलं होतं.अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.अथार्त त्याची पवार् कोणालाच नव्हती.ठीक सव्वा अकरा वाजता लाॅंगमाचर् सुरू झाला.आठ किलो मिटरचं अंतर चालत कापायला दोन तास लागले.हातात काळे झेंडे घेऊन,”मुंबई-गोवा महामागार्चं चौपदरीकरण झालंच पाहिजे”,पत्रकार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत पत्रकार चालत होते.पत्रकारांचा हा अनोखा लाॅंगमाचर् रस्त्याच्या कडेला उभे राहून हजारो नागरिक पाहात होते.हा माचर् सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी पत्रकार घेत होते.लढा जनतेसाठी आहे आणि त्याची झळ जनतेला बसता कामा नये असं साऱ्यांचंच म्हणणं होतं.२३ जानेवारीच्या आंदोलनात पोलीस आणि आमच्यात जोरदार संघषर् झालेला असल्यानं पोलिसांची संख्या फारच मोठी होती.पण आज सारं शांततेत पार पडलं..मसेज योग्य त्या यंत्रणेपर्यत पोहोचवि्ण्यात आमही यशस्वी झालो.

बरोबर सव्वा एक वाजता आम्ही पेण रेल्वे स्थानकाच्या चौकात पोहोचलो.तेथे मोचार्चं जाहीर सभेत रूपांतर झालं.राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलू द्यायला बहुतेकांचा  विरोध होता पण स्थानिक पत्रकारांच्या आग्रहामुळं बोलू द्यावं लागलं.राजकीय मंडळी बोलायली लागली की,त्यात राजकाऱण येणारच हे उघड होते . ते भाषणातून दिसून आलं.राजकाऱण करताना मग साऱ्यांनीच प्रकल्पग्रस्तांचा कळवळा व्यक्त केला.प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर आतापयर्त संतोष ठाकूर हे सामाजिक कायर्कतेर् सोडले तर कोणीच बोलत नव्हते.निलेश राणेंनी खाली अगोदर प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवा आणि मग रस्त्याचं काम करा असा आदेश दिलाय.रायगडच्या राजकारण्याची तीच भूमिका दिसली.या मागे प्रत्येकाची गणितं वेगळी आहेत.हितसंबंधही परस्परांना काटशह देणारे आहेत.शेतकऱ्यांच्या पदराआड लपून चौपदरीकऱासही विरोधाची भूमिका यामागं असू शकते.कारण थेट विरोध कोणी करू शकत नाही.मग आडपडदा घेऊन विरोध करायचा.आजपयर्ंत मौन धारण करून विरोध केला आता शेतकऱ्यांच्या नावानं विरोध होतोय.विकासाच्या प्रशनात राजकारण करायचं नाही असं सांगत कोणताही विषय राजकारण मुक्त ठेवायचाच नाही हे धोरण राजकीय पक्षाचं असतं ते आज पुन्हा दिसलं.आम्हाला मात्र प्रमाणिकपणे असं वाटतं की,प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे.चांगलं पॅकेज आणि पुनवर्सन झालं पाहिजे.सरकार ते करीत नाही.उलट शेतकऱ्यांच्या नावानं बोंबा मारतंय.चौपदरीकऱणासाठी शेतकरीच जमिनी देत नाहीत असं बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यानीच स्पष्ट केलेलं आहे.ते खोटंय.शेतकऱ्यांचे प्रतिनिधी संतोष ठाकूर यांनी आज स्पष्ट केलं की,जमिनी द्यायला आमचा विरोध नाही पण जे पॅकेज नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांना मिळालं ते आम्हाला मिळालं पाहिजे.आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत. त्याची मागणी चूक नाही . सरकारनं त्याअंगानं विचार करावा.

मात्र प्रांताधिकारी निधी चौधरी यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी चौपदरीकऱणासाठी जमिनी संपादन करताना कायद्यात पुनवर्शनाची तरतूदच नाही असं सांगितलं.हे मलाही माहिती नव्हतं.त्यामुळं एेकून धक्काच बसला.शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावायचं आणि त्यांना योग्य मोबदलाही  द्यायचा नाही आणि पुनवर्सनही करायचं नाही मग शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी काय म्हणून द्यायच्या हा देखील प्रश्न उरतोच..या विरोधात येत्या २५ तारखेला रायगडातील प्रकल्पबाधितांनी रास्तारोको आंदोलन जाहीर केलंय.आम्ही अर्थाततच शेतकऱ्यां बरोबर आहोत .

आणखी एक धक्का देणारी बातमी प्रांताधिकारी यांच्याकडून कळली.ज्या महावीर कन्स्टक्शन आणि सुप्रिम इन्फ्स्ट्रखच्र कंपन्यांनी सहा महिन्यांपासून काम बंद पाडले होते त्यांनाच पुन्हा काम दिले गेले आहे.या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली जात होती.कारण इंदापूर ते पळस्पे या पहिल्या टप्प्याचं काम माचर् २०१४प?र्त पूणर् व्हायला हवं होतं.ते कंपन्यानी केलं नाही.त्यामुळं प्रकल्पाचा खचर् कित्येक पटीनं वाढलाय.पहिल्या टप्प्याचं काम तीस टक्केच झालंय.बांधकाम मंत्र्याचे आदेश धाब्यावर बसवत ३१ मे पयर्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचं आणि राडारोडा बाजुला करण्याचं कामही या कंपन्यांनी केलेलं नाही.तरीही त्यांना काम दिले  गेले आहे. कामाची आज पर्यंतची गती पहाता  हे काम गडकरी यांनी जाहिर केल्याप्रमाणं खरोखऱच २०१७ पयर्त पूणर् होईल काय याबद्दाल मी साशंक आहे.

आमचं आजचं आंदोलन मात्र यापुवीर्च्या अनेक आंदोलनाप्रमाणंच यशस्वी झालं.कोणाला काय वाटतंय याची पवार् न करता,सामांन्याचं हित डोळ्यासमोर ठेऊन,विभागाच्या विकासासाठी एक विषय घेऊन पत्रकारांनी सतत सात वषेर् लढा सुरू ठेवलाय.कोकणात अंसं कधी झालं नाही.एवढी प्रदीघर् लढाई देखील कोणाला करावी लागली नाही.पत्रकारांच्या हा लढा म्हणजे कोकणातील जनतेच्या जिद्दीची,विकास विषयक तळमळीची,एक मिसाल आहे असं मला वाटतं.रस्त्यासाठी रस्त्यावर येणं हे पत्रकाराचं काम आहे काय असे प्रश्न आजच नव्हे तर गेली सात वषेर् अनेकांनी उपस्थित केले ,पण अशा प्रश्नांना उत्तरं देण्याच्या भानगडीत कोकणी पत्रकार कधी पडले नाहीत किंवा ते विचलितही झाले नाहीत.आपली मागणी पदरात पाडून घ्यायची याच ध्यासानं ही लढाई ते लढले.त्याला यश येत आहे.गडकरींनी २०१७ चा वादा केला.तोपयर्थ झालं नाही तरी कोकण रेल्वचं स्वप्न जसं एक दिवस पूणर् झालं तव्दतचं मुबई-गोवा महामागार्वरून सुसाट,निधोर्क प्रवासाचं कोकणी पत्रकाराचं स्वप्न आज ना उद्या प्रत्यक्षात येणारच आहे. तो दिवस आता लांब नाही.संतोष पेरणे,देवा पेरवी,विजय मोकल आणि त्यांच्या सवर् सहकाऱ्यांनी आंदोलनाचं केलेलं नीट नेटकं नियोजन,आंदोलनातील नेहमीची शिस्त,विषयाबद्दलची आत्मियता यावेळीही दिसली.वडखळ ते पेण हे आठ किलो मिटरचं अंतर महिला पत्रकारांसह सारेच पायी चालले.गाडीत बसण्याचा पलायणवाद कोणी स्वीकारला नाही.हे विशेष.

.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here