रायगड जिल्ह्यात 126 वाड्या आणि 30 गावांत पाणी टंचाई

अलिबाग :दरवर्षी ३५०० मिली मिटर पाऊस पडत असला तरी दरवर्षी जिल्हयातील अनेक गावांना पाणी टंचाईचा फटका बसतो. यावषीॅ जिल्हयातील कज॓त, पेण, रोहा, महाड, पोलादपूर, मुरूड, आणि तळा तालुक्यातील १२६ वाड्या आणि ३० गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून त्याचा थेट फटका ३४,७२६ लोकांना बसत आहे. या वाड्या आणि गावातील जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १७ खासगी आणि एका सरकारी टॅंकरची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील बहुतेक धरणं आणि विहिरीची पाणी पातळी न्यूनतम पातळीवर पोहोचल्याने पुढील काळात टंचाई ग्रस्त गावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here