अलिबागः रायगड जिल्हयातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मुरूड जंजिरा येथे मेडिकल हेल्थ केअर टुरिझम प्रकल्प उभा राहात आहे.2 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सामंजस्य करारावर महिंद्रा उद्योगसमुहाबरोबर वर्षा बंगल्यावर स्वाक्षर्‍या केल्या.या महत्वाकांक्षी आणि पथदर्शी प्रकल्पामुळं जिल्हयातील पर्यटन तर वाढणार आहेच त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध होणार असल्याने रायगड जिल्हयात या प्रकल्पाचे स्वागत होत आहे.
या प्रकल्पांतर्गत मुरूड परिसरातील हिल स्टेशन्स,फणसाड अभयारण्य,योग प्रशिक्षण,रोप-वे,स्थानिक हस्तकला,बाजारपेेठेचा विकास आणि निसर्ग पायवाटा आदि पर्यटनदृष्टया आकर्षक प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत.हा प्रकल्प इको टुरिझम संकल्पनेवर विकसित केला जाणार आहे.यातून सहा हजार स्थानिकांना रोजगोर मिळेल अशी अपेक्षा आङे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्टिटर अकाउंटवरून देखील या प्रकल्पाची माहिती दिली आहे.रायगड जिल्हयाच्या पर्यटन व्यवसायाला नवी दिशा आणि नवे आयाम देणार्‍या या प्रकल्पाचे जिल्हयात स्वागत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here