रायगड इ-बुकचे प्रकाशन

0
1377

मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेल्या रायगडला येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण निसर्गरम्य रायगडमध्ये काय पहावे,कुठे भटकंती करावी,निवास व्यवस्था कुठं चांगली होऊ शकते,भोजनाची व्यवस्था कुठे होऊ शकते,रस्त्यांचे नकाशे ,वाहनसुविधा आदिंची माहिती कुठं उपलब्ध नव्हती.पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगडः पर्यटन विविधा या इ-बुकची आणि मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.इ-बुक आणि मोबाईल अ‍ॅपचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात नुकतंच करण्यात आलं.इ-पुस्तक महाजालकावर www.raigadtourism.com येथे तसेच इ पुस्तकाच्या सर्व दालनावर उपलब्ध आहे. जिल्हयाचे संकेतस्थळ असलेल्या www.raigad.nic.in येथेही या पुस्तकाची लिंक देण्यात आली आहे.अ‍ॅपही गुगल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.या दोन्ही सुविधांमुळं रायगडात येणार्‍या पर्यटकांचा प्रवास बराच सुकर होईल आणि रायगडमध्ये नेमकं काय पहायचं याचं नियोजनही त्यांना करता येईल.
शोभना देशमुख,अलिबाग-रायगड
रायगड इ-बुकचे प्रकाशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here