“सेम नेम” फॉर्म्युला प्रभावी

0
850

प्रमुख उमेदवाराच्या विरोधात नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करून प्रमुख उमेदवाराचा प्रभाव कमी करण्याची खेळी ही रायगडच्या राजकारणात आता नेहमीची पध्दत ठरली आहे.1991 मध्ये सुरू झालेली ही पध्दत नंतर प्रत्येक निवडणुकीत वापरली गेली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे याच्या विरोधात अपक्ष सुनील तटकरे यांना दहा हजार मतं मिळाली होती.सुनील तटकरे केवळ 2 हजार मतांनी पराभूत झाल्याने नामसाधर्म्यचा फंडा किती परिणामकारक ठरतो हे दिसून आलंय.
विधानसभा निवडणुकीत देखील नामसाधर्म्याची क्लुप्ती वापरली जातेय.श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण ही निवडणूक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावावरच लढविली जाणार असल्याने तेथे सुनील दत्तात्रय तटकरे नावाचे अपक्ष उमेदवार उभे आहेत.अलिबागमध्ये शिवसेनेच्या महेंद हरी दळवी यांचा सामना करण्यासाठी समान नाव असलेले जनता दल युनायटेडचे महेंद्र हरी दळवी रिंगणात आहेत.शेकापच्या पंडित उर्फ सुभाष पाटील यांच्याशी लढत देण्यासाठी अपक्ष सुभाष पाटील आणि अपक्ष पंडित वामन पाटील असे दोन उमेदवार रिंगणात आहेत.कॉग्रेसच्या मधुकर शंकर ठाकूर यांच्या विरोधात मधुकर रामभाऊ ठाकूर हे अपक्ष उमेदवार उभे आहेत.उरणमध्ये शेकापचे विवेक पाटील आणि पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांच्या नावांशी साम्य असलेले उमेदवार उभे करणयात आले आहेत.
नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनी मागील काही निवडणुकातं घेतलेली लक्षणीय मतं विचारात घेता यावेळेस नामासाधर्म्य असलेले उमेदवार बहुतेक प्रमुख उमेदवारांसाठी डोकेदुखी ठऱणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here