रायगडातील धरणांनी तळ गाठला

0
771

जूनच्या तिसऱ्या आठवड्यात रायगडातील धरणं ओसंडून वाहत असतात मात्र यावेळी जिल्हयातील अनेक धरणांनी तळ गाठला असून जिल्हयातील धरणात जेमतेम 22.51 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे,हा साठा आणखी जेमतेम एक महिना जिल्हयातील जनतेची तहान भागवू शकणार आहे.रायगड जिल्हयात 53 छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.त्यातील अनेक धरणं कोरडी पडली आहेत.कोथुर्डी धरण कोरडे पडले आहे.फणसाड,कार्ले,कुडली,वरंध,खैरे साळोखे,बामणोली ,भिळवली,तिनविरा आदि धऱणात 10 ते 12 दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.धरणातील पाण्यांनी तळ गाठल्यानं अनेक गावं आणि वाड्‌यांना पाणी टंचाईचे संकट भेडसावू लागले आहे.जिल्हयात 150 गावं आणि वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.तर ठिकाणी पाणी कपात केली जात आहे.
रायगड जिल्हयात गेल्या वर्षी 1 ते 26 जून या कालावधीत 1076.88 मि.मी.पावसाची नोंद झाली होती.यावर्षी आतापर्यत केवळ 150,79 मिली मिटरच पाऊस झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य सर्वत्र जाणवत आहे.जिल्हयात दरवर्षी सरासरी 3 हजार मिली मिटरपर्यत पाऊस पडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here