चला भिजायला रायगडात

0
1264

 रायगडला पावसानं झोडपून काढलंय.नद्यांना अजून महापूर वगैरे आलेले नसले तरी रायगडच्या सौदर्यात भर घालणारे नयनमनोहरी धबधबे मात्र वाहू लागले आहेत.खरं तर कोकणात कुठंही गेलं तरी धबधबे वाहताना दिसतात.परंतू धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घ्यायचा असेल तर रायगडात असे काही धबधबे आहेत की,तिथं आवजुर्न गेलंच पाहिजे.कोणते आहेत हे धबधबे ? याची सविस्तर माहिती एस.एम.देशमुख यांच्या असा हा रायगड या पुस्तकात दिलेली अाहे.कोठे आहेत हे धबधबे आणि तिथं जायचं कसं याची माहिती पुस्तकात दिलेली आहे.मात्र खास बातमीदारच्या वाचकांसाठी काही धबधब्यांची माहिती येथे देत आहोत.
१) मुरूड जिल्हयातील दूर डोंगरातला सवतकडा धबधबा २) मुरूड तालुक्यातील गारंबीचा धबधबा ३) मुरूड तालुक्यातच फणसाड अभयारण्य आहे,तेथील फणसाड धबधबा ४)अलिबाग पासून पाच किलो मिटर अंतरावर असलेला सिध्देश्वर धबधबा ५)महाडपासून ३४ किलो मीटर अंतरावर असलेला शिवथरघळ धबधबा ५) पोलादपूर तालुक्यातील मोरझोत धबधबा ६)घागरकोंड येथील धबधबा आणि झुलता पूल
७) रिचाजर् व्हायचं असेल तर माथेरानमध्ये अनेक धबधबे आहेत.८)पनवेलनजिकचा पांडवकडा धबधबा ९)कजर्तजवळचा क्राॅस धबधबा ९)नेरळजवळचा मंगलमूतीर् धबधबा १०) कजर्त तालुक्यातील भिवपुरी-कजर्त दरम्यानचा आषाणे-पाषाणे धबधबा ११) खोपीली जवळचा झेनिथ धबधबा १२) पेण तालुक्यातील महलमिरा धबधबा १३)पेण -खोपोली रस्तायवारचा सापोली धबधबा १४) पनवेल तालुक्यातील आपटे गावाजवळचा धबधबा १५)महाड तालुक्यातील मांडले धबधबा १६) महाड तालुक्यातील मांडले धबधबा.याशिवाय जिल्हयात अनेक धबेघबे आहेत ते की,आपणास मनमुराद आनंद देऊ शकतात.तिथं जा आनंद द्या,पण मस्ती करू नका,निसगार्चे नियम पाळा.कारण रायगडात धबधब्यात बुडून किंवा दगड अंगावर पडून अपघात होतात.दरवषीर् अनेक पयर्टक मृत्यूमुखी पडतात.तेव्हा जा..पण सावधानता बाळगा एवढंच सागणं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here