रायगडमध्ये पत्रकारावर हल्ला

0
752

रायगडमध्ये सकाळच्या पत्रकारावर हल्ला
रायगड जिल्हयातील माणगाव येथील सकाळचे बातमीदार कमलाकर होवाळ यांना आज भाल येथे काही गुंडांनी मारहाण केली.मुंबई-दिल्ली औद्योगिक कॅरिडोरसाठी 21 गावातील जमिन संपादन कऱण्यात येत आहे.ज्या जमिनी अगोदरच दलालानी घेऊन ठेवल्या आहेत त्या दलालांचा प्रकल्पाला पाठिंबा असला तरी जे मूळ शेतकरी आहेत ते मात्र आपल्या जमिनी प्रकल्पाला देण्यासाठी तयार नाहीत.कमलाकर होवाळ असतील किंवा रायगडमधील बहुसंख्य पत्रकारांनी नेहमीच स्थानिक शेतकऱ्यांच्याच हिताची भूमिका घेतली आहे.हे या दलालांना माहिती आहे.आज भाल आणि परिसरात जमिनी मोजण्याचे काम सुरू होते.तेथे होवाळ वृत्तसंकलनासाठी गेले असता तेथे अचानक दोन-तीनजण आले आणि त्यांनी याला येथून हाकला म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली.त्यांना बेदम मुकामार लागला आहे.
या घटनेची रायगडमधील पत्रकारांनी गंभीर दखल घेतली असून सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.मात्र केवळ शाब्दिक निषेध करीत न बसता ठोस भूमिका घेतली जावी अशी मागणी पत्रकार करीत आहेत.रायगडमधील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लबनेही ही घटना गंभीरपणे घेत आरोपींना तातडीने अटक झाली नाही तीव्र आंदोलन कऱण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे दीपक शिंदे,मराठी पत्रकार परिषदेेचे सरचिटणीस संतोष पवार,विभागीय चिटणीस मिलींद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष विजय पवार आणि नियोजित अध्यक्ष संतोष पेऱणे आदिंनी या घटनेचा ऩिषेध केला आहे.
महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या घटनेचा धिक्कार करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here