मे महिन्यात 5 पत्रकारांवर हल्ले

0
865

महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.अलिकडच्या काळात पत्रकारांवरील हल्लयााच्या काही घडलेल्या घटना.गेल्या साडेपाच महिन्यात महाराष्ट्रात 32 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.ही आकडेवारी केवळ आमच्याकडं आलेल्या माहितीची आहे.प्रत्यक्षात यापेक्षा अधिक हल्ला झालेले आहेत.

करमळा ( सोलापूर )18 एप्रिल 2015
पंढरपूर येथील दूरदर्शनचे पत्रकार अभिराज उबाळे हे करमळा येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या कार्यक्रमाची बातमी संकलीत कऱण्यासाठी गेले असता त्यांना पोलिसांनी धक्का बुक्की केली.याची तक्रार पत्रकारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्याकडं केल्यानंतर त्या पोलिसाना निलंबित कऱण्यात आलं

1 मे 2015 पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड येथील आय़बीएन लोकमतचे वार्ताहर गोविंद काकडे यांनी बाटली बंद पाण्याचे काळे सत्य उघडकीस आणणारी बातमी दिल्याबद्दल मिनरल ड्रिकींक वॉटर प्लांट चालविणाऱ्या मालकाने त्याना जिवे मारण्याची धमकी दिली.याची तक्रार पिंपरी पोलिसात दाखल कऱण्यात आली आहे.

कळंब( उस्मानाबाद) 17 मे 2015
उस्मानाबाद जिल्हयाच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील दैनिक जनप्रवासचे प्रतिनिधी सुशीलकुमार पाटील यांना शिरढोण येथील पोलिसांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.पोलिस अधिक्षकांकंडं तक्रार दाखल करण्यात आली.

सासवड (पुणे ) दिनांक 19 मे 2015
पुणे जिल्हयातील सासवड नजिकच्या गराडे येथील म्हस्कू खवले यांच्यावर रेती माफियांनी हल्ला करून जबर जखमी केले.त्यांच्या हाताला मार लागला आहे.सासवड येथील पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here