मुंबई- अलिबाग आता पंधरा मिनिटांत

0
798

सध्याच्या उपलब्ध साधनांनी मुंबई ते अलिबाग हे अंतर कापन्यासाठी समुद्रमार्गे एक तास लागतो.मात्र येत्या काही दिवसातच मुबई ते अलिबाग जलमार्गावर पाण्यावर चालणाऱ्या टॅक्शी धावणार असल्याने आठ नॉटिकल मैलाचे हे अंतर केवळ पंधरा मिनिटात कापता येणार आहे.राज्य सरकारने या प्रकल्पास मान्यता दिली आहे.प्रयोगिक तत्वावरील हा प्रकल्प यशस्वी झाल्यास नजिकच्या काळात गेट वे ते एलिफंटा.गेट वे ते जेनपीटी,गेटवे ते मोरा,गेट वे ते नवी मुंबई या जलमार्गावरही अशीच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.नवीन सुविधेमुळे अलिबाग,मुरूड ही पर्य़टन स्थळं आता मुंबईच्या अधिक जवळ येत आहेत.
पाण्यावर चालणाऱ्या या टॅक्शीची प्रवासी क्षमता 12 एवढी असून मुंबईतील दोन खासगी कंपन्यांना सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे.येत्या महिनाभरात ही सुविधा सुरू होणार आहे.मात्र आठ नॉटिकल मैलासाठी या टॅक्शीचे भाडे एक हजार रूपये आकारले जाणार असल्याने सामांन्य व्यक्तिंसाठी हा प्रवास एक दिवास्वप्नच ठरणार आहे.सध्या अलिबाग-माडवा- मुंबई या जलमार्गावर ज्या फेरी बोटी किंवा कॅटमरान धावतात त्यांचे भाडे 60 रूपये ते 110 रूपये एवढे असल्याने टॅक्शीचे एक हजार भाडे भरून किती प्रवासी या टॅक्शीने प्रवास करतील याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here