मीठागारांना अखेरची घरघर

0
1106

भात,मासळी आणि मीठाचे आगार ही रायगडची ओळख आता जवळपास संपुष्टात आली आहे.वाढते नागरिक रण,येत असलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्र कमी झाल्याने भात पिकाचे उत्पादन घटले आहे.प्रदूषणामुळे सातत्यानं मासळीचाही दुष्काळ जाणवायला लागला असून रायगडमध्ये कधीकाळी 4500 ते 5000 हेक्टर जमिनीवर केली जाणारी मीठ शेती देखील आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.रायगडमध्ये उरण आणि पेणमध्ये मोठ्या प्रमाणावर मीठागरे होती.त्यातील उरणमधील मीठागरे जेएनपीटी आणि अन्य प्रकल्पांमुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात संपुष्टात आली आहेत.पेणमध्ये 2200हेक्टरवर असलेल्या मीठागारांंंंंंपैकी बोरी,शिर्की,मसद,वाशी,ओढंगी या परिसरात सध्या क ेवळ हजार ते बाराशे हेक्टर क्षत्रफळावर मीठ शेती केली जाते.परंतू आता या भागातही मोठया प्रमाणावर प्रकल्प येत असल्याने आणि मिठ शेतीलाही चांगली किंमत मिळत असल्याने मिठागरांच्या मालकांचा कल जमिन विक्रीकडं दिसतो आहे.नव्या पिढीलाही कष्टप्रद मीठ व्यवसायाचं आकर्षण शिल्लक नसल्याने हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या मीठ उद्योगाचे अस्तित्वच येत्या काही दिवसात संपुष्टात येणार आहे.त्यामुळे दुरून बर्फासारखी भासणारी कित्येक किलो मीटरपर्यत पसरलेली मीठ शेती यापुढे केवळ चित्रांमधूनच बघायला मिळणार आहे. सध्या खडी मीठाचा दर किलोला सतरा रुपये एवढा आहे.मात्र कधीकाळी रायगडात 50 रूपयांंंंंंंला 40 किलो मीठ मिळत होते हे वास्तव येत्या पिढीला सांगितले तरी खरे वाटणार नाही.गेली शेकडो वर्षे रायगडकरांच्या उपजिविकेचं साधन बनलेले परंपरागत उद्योग आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहेत.
शोभना देशमुख पेण रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here