माहिती विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या.

0
735

माहिती आणि जनसंपर्क विभागातील चार उपसंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.लातूर विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांची बदली नागपूर,अमरावती विभागाचे उपसंचालक म्हणून झाली आहे.नागपूर विभागाचे उपसंचालक मोहन राठोड यांची बदली पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून झाली आहे.पुण्याचे उपसंचालक यशवंत भंडारे यांना लातूर विभागाची सूत्रे सोपविली गेली आहेत तर रिक्त असलेल्या कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकपदी नाशिकहून सतीश लळित यांना पाठविणयत आले आहे.नाशिकच्या उपसंचालकपदी आता कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.औरंगाबाद विभागाला उपसंचालक नाही आणि तेथील संचालकाची जागाही दीर्घकाळ रिक्त आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here