डोंगर पोखरून नार्वेकरांना शोधले

    0
    804

    राहूल नार्वेकर राष्ट्रवादीत दाखल झालेत.आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनेच्या अतंर्गत राजकारणाला कंटाळून आपण शिवसेनेचे शिवबंधन तोडले असं त्याचं म्हणणय.यापूर्वी अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडले.तेव्हा त्यांनी नार्वेकरांच्या राजकारणामुळे आपण बाहेर पडलो असं सांगितलं होतं.त्याचं ते विधान खरं असेल तर राजकारणात काळ कोणालाही क्षमा करीत नाहीत,असं म्हणता येईल.जे राजकारण करून त्यांनी इतराना बाहेरचा रस्ता दाखविला त्याच राजकारणाचे ते बळी ठरले.आता ते राष्ट्रवादीत गेले आहेत.मावळमधून उभे राहात आहेत. राष्ट्रवादीला मावळसाठी उमेदवार मिळत नव्हता. त्यासाठी डोंगर पोखऱणे सुरू होते.त्यातून नार्वेकर हाती लागले.राहूल नार्वेकर चुकून जिंकलेच तर त्याचं पुनर्वसन होईल.ते पराभूत झाले तर राजकीय विजनवासात जातील.कारण ते राणे किंवा भुजबळांसारेखे लोकनेते नाहीत.दरबारी राजकारण करणारे ते नेते आहेत.त्यामुळे त्यांचा पराभव हा त्यांच्या राजकारणाची इतश्री कऱणारा ठरणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here