माथेरानमध्ये कडकडीत बंद

0
656

नेरळ माथेरान रेल्वे बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात माथेरानकरांनी काल बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत हरताळ पाळला.असंख्य स्थानिकांनी रेल्वे स्थानकात जाऊन जोरदार निदर्शने केली.1 मे आणि 8 मे रोजी माथेरान रेल्वेचे डबे रूळावरून घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे अनिश्‍चित काळासाठी बंद केली आहे.त्या विरोधात माथेरानकर एकवटले असून माथेरानची जीवनवाहिनी असलेली ही रेल्वे पुर्ववत सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.याच मागणीसाठी आता 14 मे रोजी नेरळ रेल्वे स्थानकात जोरदार आंदोलन कऱण्यात येणार आहे.15 एप्रिल 1097 रोजी सुरू असलेल्या माथेरानची मिनिट्रेन पर्यटकांचे आकर्षण असून माथेरानमधील व्यापारी,विद्यार्थी सर्वस्वी माथेरनच्या रेल्वेवरच अवलंबून आहेत.ही रेल्वे कायमस्वरूपी बंद झाली तर त्याचा माथेरानच्या पर्यटनावर मोठा परिणाम होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here