माथेरानची रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा डाव

0
657

माथेरानच्या मिनिट्रेनला सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे नेरळ-माथेरान ही राज्यातील एकमेव मिनिट्रेन आता अनिश्‍चितकालासाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे माथेरानकर संतप्त झाले आहेत.11 मे रोजी माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळून,आणि स्थानकात जोरदार निदर्शने करून माथेरानकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आज 14 मे रोजी नेरळ स्थानकात जोरदार आंदोलन कऱण्यात येत आहे. खासदार श्रीरंग बारणे या आंदोलनाचं नेतृत्व कऱणार आहेत.
1 आणि 8 मे रोजी माथेरानच्या मिनीट्रेनचे डबे रूळावरून घसरले.त्यामुळं रेल्वेच्या सुरक्षित प्रवासाबाबत चर्चा सुरू झाली.त्यावर योग्य तो उपाय शोधण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने माथेरानची जीवनवाहिनी असलेली रेल्वेच बंद कऱण्याचा निर्णय घेतला.रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय आजारा पेक्षा उपचार जालीम अशा पध्दतीचा असल्याचा स्थानिकांचे म्हणणे आहे. माथेरानची रेल्वेसेवा कायमस्वरूपी बंद करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.ही रेल्वे बंद झाली तर माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा दुरगामी परिणाम होणार आहे.कारण माथेरानचा निसर्ग ,येथील थंड हवेचे जेवढे आकर्षण पर्यटकांना आहे तेवढेच आकर्षण माथेरानच्या झुकझुक गाडीचेही आहे.त्यामुळे ही गाडी तातडीने पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी आता माथेरानकर एकवटले आहेत.
15 एप्रिल 1907 रोजी माथेरान रेल्वेने 795 मीटर उंचीचा माथेरानचा डोंगर पहिल्यांदा सर केला.अनेक वळणं,अवघड चढण पार करीत 21 किलो मिटरच्या प्रवासासाठी ही रेल्वे दोन तास घेणे.माथेरानला येणार्‍या पर्यटकांसाठी झुकझुक गाडीचा प्रवास एक वेगळी अनुभुती देणारा,प्रवास असतो.त्यामुळे बहुतेक पर्यटक रेल्वेच्या प्रवासालाच संमती देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here