महाराष्ट्रात पत्रकारांची हेतुतः उपेक्षा :एस.एम.देशमुख

पश्चिम बंगाल, ओरिसा
मध्य प्रदेशातील पत्रकार झाले
फ्रन्टलाईन वर्कर

पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा मिळवल्यानंतर पहिलीच घोषणा!
सगळे पत्रकारही करोना योद्धा; ममता दीदींनी केलं जाहीर

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय व तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज(सोमवार)एक घोषणा केली. या पुढे आता पश्चिम बंगालमधील सगळे पत्रकार देखील करोना योद्धे असणार आहेत.

”मी सर्व पत्रकारांना कोविड योद्धा असं घोषित करते.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसमोर जाहीर केलं आहे. याशिवाय आज मध्य प्रदेश सरकारने देखील सर्व मान्यताप्राप्त पत्रकरांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कालच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील, श्रमिक पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स म्हणून घोषित केलं आहे.

महाराष्ट्र सरकारनं मात्र राज्यातील पत्रकारांना वारयावर सोडले आहे. अर्ज, विनंत्या, आंदोलनं आणि आत्मक्लेष करूनही राज्य सरकारवर त्याचा फरक पडत नाही.. राज्य सरकार हेतुतः पत्रकारांची उपेक्षा करीत असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here