महाड ः अपघातग्रस्त दोन्ही बसमध्ये 22 नव्हे 29 प्रवासी 

    0
    807
    महाड ः अपघातग्रस्त दोन्ही बसमध्ये 22 नव्हे 29 प्रवासी 
    महाड दुर्घटनेतील बसमध्ये 22 नव्हे तर 29 प्रवासी होते असा दावा जिल्हा प्रशासनाने केल्याने अपघातग्रस्त दोन्ही बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याचे गुढ वाढले आहे.कन्डक्टरकडे तिकिटे देण्यासाठी असलेल्या ट्रायमॅक्स मशिनव्दारे दिल्या गेलेल्या तिकिटांची माहिती स्थानिक एस.टी.आगार आणि मुख्यालयाला मिळते.मात्र चिपळूण नंतर भोस्ते घाट आणि नंतरच्या कशेडी घाटात ट्रायमॅक्स यंत्राची रेंज गेल्याने सर्व प्रवाशांची नोंद मुख्यालयात झाली नाही.हे 7प्रवासी खेड किंवा भरणा नाका किंवा पोलादपूरला एस.टी.मध्ये चढले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.एस.टी.महामंडळ गाडीतील मृत प्रवाश्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रूपये देणार आहे.मात्र ही रक्कम देतााना नोंद न झालेल्या सात प्रवाश्यांच्या बाबतीत अनेक तांत्रीक बाबी तपासाव्या लागणार आहेत.दरम्यान आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले असून जे मृतदेह हाती लागले नाहीत त्यांचे नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.तपासकार्य संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ते करीत आहेत.हे काम वेगाने न झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे–

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here