पुणे जिल्हयातील पत्रकार उद्या करणार
आहेत घरी बसल्या -बसल्या मतदान 

मराठी पत्रकार परिषद आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या इतिहासात उद्याचा रविवार सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल.कारण उद्या देशात प्रथमच एखादया पत्रकार संघटनेच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं होत आहेत.म्हणजे संस्थेकडं सदस्यांनी जे मोबाईल नंबर नोंदविले गेले आहेत,त्या नंबंरवरून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करता येणार आहे.म्हणजे रांग लावायला नको,मतदान केंद्रात जायलो नको घर बसल्या बसल्या आपण मतदान करू शकणार आहोत.सकाळी 10 ते 3 या वेळात हे मतदान होईल.मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काही क्षणात आपल्याला निकालही कळेल.

मराठी पत्रकार परिषद किंवा जिल्हा संघांच्या निवडणुका पूर्वी बॅलेट पेपर मतदारांकडं पाठवून होत असत.त्यासाठी भरपूर वेळ आणि प्रचंड खर्च होत असे.ऑनलाईन पध्दतीमुळे संस्थेचा खर्च तर वाचलाच त्याचबरोबर वेळही वाचला आहे.ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ ,अधिक  पारदर्शक झाली आहे.अन्य जिल्हयात आता अशाच पध्दतीनं निवडणुका घेतल्या जाणार आहेत.उद्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर परिषदेच्या इतिहासातही एका नव्या पर्वाला आरंभ होत आहे.यापुर्वी शिरूर तालुका पत्रकार संघाच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं यशस्वी झाल्या.51 पैकी 50 सदस्यांनी मतदान केले.म्हणजे या पध्दतीनं शंभर टक्केच्या आसपास मतदान होते.जिल्हा स्तरावर या निवडणुका मात्र प्रथमच होत असून त्या घेण्याचा मान पुणे जिल्हयाला मिळाला आहे.जिल्हयात 500च्या जवळपास सदस्य आहेत.हे सर्व सदस्य घरी बसल्या बसल्या उद्या आपला प्रतिनिधी  निवडणार आहेत.

पुणे जिल्हयातील या निवडणुका कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष अशा चार पदांसाठी होणार होत्या.यातील सरचिटणीस बिनविरोध निवडले गेल्याने आता तीन पदांसाठी निवडणुका होत असून सहा उमेदवार रिंगणात आहेत.या सर्व उमेदवारांनी अत्यंत संयमाने,कोणतेही आरोप-प्रत्यारोप न करता आपला प्रचार केला आहे.आपण विजयी झालो तर पत्रकारांसाठी काय करणार आहोत याची माहिती उमेदवारांनी व्हॉटसअ‍ॅपवरून दिली.दोन्ही पॅनलचा सकारात्मक प्रचारावर अधिक जोर होता.अत्यंत शांततेत,परस्परांचा आदर ठेवत दोन्ही बाजुंनी प्रचार केल्याबद्दल सर्वच उमेदवारांचे अभिनंदन केले पाहिजे.पुणे जिल्हा बदलतो आहे,निवडणूक प्रक्रियेपासून त्याची सुरूवात झाली आहे.त्याअर्थानं उद्याचा दिवस पुणे जिल्हयासाठी एतिहासिकच ठरणार आहे.

महाराष्ट्रात पत्रकारांच्या संघटनांची संख्या मोठी आहे.परंतू अनेक संघटना या प्रायव्हेट कंपनी असल्यासारख्या चालतात.मराठी पत्रकार परिषद ही अशी एकमेव संघटना आहे की,दर दोन वर्षांनी संस्थेच्या निवडणुका होतात.आता परिषद आणि जिल्हा संघांच्या निवडणुका ऑनलाईन होणार असल्यानं एक मोठा बदल परिषदेच्या व्यवस्थेत होत आहे.ज्या जिल्हा संघांच्या मुदती संपल्या आहेत त्यांनी तातडीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे.त्याना ऑनलाईनचे सॉफ्टवअर माफक दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here