भारतात “अशीही” सेन्सॉरशीप

0
766

मुंबई- आणीबाणी अथवा सेन्सॉरशीप हे शब्द आजच्या तरूण पत्रकाराच्या पिढीला क ेवळ वाचून किंवा ऐकूनच माहिती असताली.कारण इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली त्या घटनेनंतरच आजच्या तरूण पत्रकारांपैकी अनेकांचा जन्म झालेला असू शकतो.इंदिरा गांधीची सेन्सॉरशीप माहिती नसलेल्या तरूण पत्रकारांना आता वेगळ्या सेन्सॉऱशीपला तोंड द्यावं लागतंय.भारतात माध्यमांना सेन्सॉरशीपच्या दडपणाखालीच काम करावं लागतंय,हे आमचं म्हणणं नाही तर न्यूयार्क टाइम्सचं ते अवलोकन आहे.न्यूयार्क टाइम्सच्या 28 जुलैच्या अग्रलेखात टाइम्सनं भारतात सेन्सस्रऱशीप असल्याचा निष्कर्ष काढलाय.बड्या आणि भांडवलशाही वृत्तपत्रांचे मालक आणि राजकारण्यांकडून ही सेन्सॉरशीप लादली जात असल्याचं टाइम्सचं म्हणणं आहे.
टाइम्स ने त्याबाबतची काही उदाहरणं दिली आहेत.काही माध्यम समुहाची मालकी बदलली आहे त्यानुषंगानं त्याचं ंसंपादकीय धोरणंही बदलंलं आहे.बदललेल्या धोरणानुसार काम कऱण्याची सक्ती संपादकांवर केली जात आहे.हे करायला जे तयार नाहीत त्यांना राजीनामा द्यायला तरी सांगितले जात आहे किंवा कामावरून कमी तरी केले जात आहे.गेल्या ऑक्टोबरमध्ये सिध्दार्थ वरदराजन यांनी हिंदू चा राजीनामा दिला.कारण बदलत गेलेल्या संपादकीय धोरणाशी जमवून घेणे त्यांना जमले नाही ( अलिकडेच पी.साईनाथ यांनीही हिंदू सोडले आहे) ओपन मासिकाचे हरतोश सिंह बल याना क ामावरून काढून टाक ले गेले.संपादक मनु जोसेफ यांनी राजीनामा दिला हाोता.डीएनएच्या अलिकडच्या एका लेखाचा उल्लेख टाइम्सनं केलाय.राणा अय्युब यांचा एक लेख डीएनएने आपल्या वेबसाईटवरून काढून टाकला.या लेखात अमित शहा यांना भाजपा अध्यक्ष कऱण्याच्या निर्णयावर टीका करण्यात आली होती.
राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांनी नेटवर्क-18च्या दिलेल्या राजीनाम्याचाही संपादकीयात उल्लेख आहे.टीव्ही-18 बॉडकास्ट लिमिटेड ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने घेतल्यानंतर यी दोघांनी राजीनामे दिले आहेत.( निखिल वागळे यांनीही अलिकडेच राजीनामा दिला आहे)बदललेल्या धोरणाशी जमवून घेण्यास नकार दिल्याने हे घडल्याचं टाइम्सनचं म्हणणं आहे.टीव्ही-18 च्या मार्फत सीएनएन-आयबीएन,सीएनबीसी,वायाकॉम,आयबीएन-लोकमत तसेच फोर्ब्सस मासिक चालविले जाते. या साऱ्या घटना माध्यमांची मुस्कटदाबी कऱणाऱ्या असल्याचा टाइम्सचा दावा असू शकतो.टाइम्सने व्यक्त केलेले मत कटू असले तरी त्यात सत्यांश आहे.ही सेन्सॉरशीप एवढ्यापुरतीच नाही तर पत्रकारांवर हल्ले करून त्यांच्यावर दहशत बसविणे,व्यवस्थापनावर दबाव आणून पत्रकारांच्या नोकऱ्या घालविणे अशा प्रकारेही ही सेन्सॉरशीप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here