बीड जिल्हयातील पत्रकारांना आवाहन 

0
1076

 मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ज्या जिल्हा संघात वर्षानुवर्षे निवडणुकाच झालेल्या नाहीत अथवा तरूण पत्रकारांना सदस्य होण्याची संधी दिली गेलेली नाही अशा ठिकाणी नव्यानं सदस्य नोंदणी करून ऑनलाईन पध्दतीनं निवडणुका घेण्याची प्रक्रिया परिषदेने सुरू केलेली आहे.त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हयात अशी निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.तेथे नव्याने सदस्य नोंदणी सुरू असून 31 तारखेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.त्यानंतर फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवडयात ऑनलाईन पध्दतीनं निवडणुका घेतल्या जातील.मराठी पत्रकार परिषदेने ऑनलाईन निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर पहिल्यांदा निवडणुका ऑनलाईन घेण्याचा बहुमान बीडला मिळत आहे.त्याअर्थानं बीड संंघाच्या निवडणुका ऐतिहासिक ठरणार आहेत.बीड जिल्हयातील जास्तीत जास्त पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा संघाचे सदस्य व्हावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.

बीड जिल्हयात पत्रकारांच्या काही संघटना आहेत याची आम्हाला कल्पना आहे.काही नव्यानं निर्माण होऊ घातल्याचंही वाचण्यात आलं आहे.कोणत्याच पत्रकार संघटनेला आमचा विरोध नाही.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या पुढाकारानं राज्यातील 16 संघटना एकत्र आलेल्या आहेत.त्यातूनच पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झालेली आहे.त्यामुळं तो मुद्दाच नाही.मात्र संघटनेचा उद्देश स्पष्ट असला पाहिजे.पत्रकार हित एवढंच ध्येय असलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे.हक्कासाठी रस्त्यावर उतरणं,समाजाच्या प्रश्‍नासाठी आग्रही भूमिका घेत आंदोलन कऱणं,विविध उपक्रम राबविणं,पत्रकार आरोग्य शिबिरं घेणं तसेच गरजू पत्रकारांना हरप्रकारची मदत करणं हे पत्रकार संघटनेचं काम आहे असं आम्हाला वाटतं.’हे पत्रकाराचं काम आहे का ?  ते काम आहे काय’? असे प्रश्‍न काही जण उपस्थित करतात अशा मित्रांना आम्ही सांगू शकतो की समाजाच्या हिताचं,पत्रकाराच्या आत्मसन्मासाठी आणि हक्कासाठी करावं लागणारं प्रत्येक काम हे संघटनेचं काम आहे.मराठी पत्रकार परिषदेनं ते दाखवून दिलेलं आहे.एस.एम.सरांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शनसाठी आंदोलन सुरू आहे.जेव्हा हा कायदा होईल तेव्हा याचा लाभ अधिस्वीकृती असलेल्यांना आणि नसलेल्यांना होणार आहे.पत्रकारांचे सतरा प्रश्‍न एस.एम.सरांच्या नेतृत्वाखाली आपण मार्गी लावले आहेत.गेल्या वर्ष भरात 16 पत्रकारांना आपण आर्थिक आणि अन्य स्वरूपाची मदत दिलेली आहे त्यात बीडच्या शंकर साळुंके या पत्रकाराचाही समावेश आहे.ही सारी कामं परिषद यापुढंही करीत राहणार आहे.ही काम करतानाच निवडणुका नियमित झाल्यापाहिजेत असाही आमचा आग्रह आहे.बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुका गेली पंधरा वर्षे झालेल्या नव्हत्या.गेली कित्येक वर्षे सदस्य नोंदणी झालेली नव्हती.त्यामुळं एक साचलेपणा आलेला होता.पदावर कोण व्यक्ती होती, आहे,हा मुद्दाच नाही ,नियम सार्‍यांनाच बंधनकराक असले पाहिजेत.येत्या ऑगस्टमध्ये एस.एम.देशमुख यांची मुदत संपणार आहे आणि त्यानंतर ते देखील पायउतार होणार आहेत .अखिल भारतीय अध्यक्षांना जो नियम तोच जिल्हा अध्यक्षांना लागू आहे.बीडमध्ये निवडणुका झालेल्या नव्हत्या त्यामुळं हा संघ बरखास्त केला गेला.अन्य जिल्हयातही टप्प्याटप्यानं हीच भूमिका घेतली जाणार आहे.5 मार्च रोजी नांदेड येथे राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा होत आहे.यावेळी तालुका पत्रकार संघ अधिक बळकट,मजबूत आणि सक्षण करण्यासाठी काही ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.

बीडला पत्रकारितेचा मोठा वारसा आहे..आजही बीडचे अनेक तरूण पत्रकार पुण्या-मुंबईत बीडचे नाव रोषण करीत आहेत.या पवित्र भूमीत पत्रकारांचं संघटन मजबूत असावं,एक दबावगट निर्माण करून आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी पत्रकारांची भक्कम एकजूट असावी याासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.बीड जिल्हयातील अनेक पत्रकारांवर हल्ल ेझाले आहेत त्यावेळेस आक्रमकपणे त्याचा प्रतिकार झाल्याचे एक उदाहरण सोडले तर अन्य उदाहऱणं नाहीत.त्यामुळं काळ सोकावत चालला आहे.अशा स्थितीत आपण एका भक्कम आणि 78 वर्षाची लढाऊ परंपरा असलेल्या परिषदेच्या झेंडयाखाली एकत्र आलो तर नक्कीच चित्र बदललेले दिसेल.रायगडमध्ये आज पत्रकारांचं मोठं एकजिनसी संघटन उभं आहे.त्याच धर्तीवर बीडमध्ये प्रयोग करण्याचा एस.एम.देशमुख यांचा प्रयत्न आहे.त्यासाठी त्यांना मदत करणं आणि जास्तीत जास्त संख्यनं परिषदेच्या झेंडयाखाली एकत्र येणं आवश्यक आहे.आपल्या करिअरवर पाणी सोडून देशमुख पत्रकारांच्या हक्कासाठी लढत आहेत,पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरत आहेत.त्यांचे हात मजबूत करण्याची सर्वाधिक जबाबदारी बीड जिल्हयातील पत्रकारांची आहे काऱण ते बीडचे भूमीपूत्र आहेत.उभा महाराष्ट्र एकसंघपणे त्यांच्या पाठिशी आहे ,बीड जिल्हयातील पत्रकारांनीही भुलथापांना बळी न पडता आपल्या माणसाचे हात बळकट केले पाहिजेत असं आवाहन आम्ही करीत आहोत.बीड जिल्हयातील पत्रकारांना विनंती की,जास्तीत जास्त संख्येनं सदस्य होऊन बीड जिल्हा हा मराठी पत्रकार परिषदेचा बालेकिल्ला आहे हे दाखवून द्यावे .

आपले

किरण नाईक ( विश्‍वस्त)

सिध्दार्थ शर्मा ( कार्याध्यक्ष)

यशवंत पवार ( सरचिटणीस)

मिलिंद अष्टीवकर (कोषाध्यक्ष )

अनिल महाजन ( मराठवाडा विभागीय चिटणीस)

विजय जोशी ( मराठवाडा विभागीय चिटणीस ) 



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here