बीडच्या वृत्तपत्राने पंकजा मुंडे आणि खा.प्रितम मुंडे  यांचा उल्लेख बाई असा केल्याने बीड भाजप संतप्त 

0
1160
एखादया महिलेचा  उल्लेख बाई असा करणे म्हणजे ती भाषा असभ्य आहे काय,? ती असेल तर मग “ताई,बाई,अक्का,विचार करा पक्क, अमुक अमुक चिन्हावर मारा शिक्का” असा घोषणा निवडणूक काळात दिल्या जातात तो तमाम महिला वर्गाचा अपमान नाही का? असे प्रश्‍न आज बीडमध्ये विचारले जात आहेत.याचं काऱण ठरलंय ते बीड येथील लोकाशा वर्तमानपत्रानं खासदार प्रितमताई मुंडे आणि बीडच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचा एका बातमीत बाई असा उल्लेख केल्याचा.बीड शहरातील रस्त्याची पार रया गेली आहे.खड्यात रस्ते आहेत की,रत्यात खड्डे आहेत हे समजने कठीण झाले आहे.त्यामुळे बीडच्या लोकाशाने याकडे लक्ष वेधण्यासाठी खासदारणीबाई,पालकमंत्रीणबाई इकडे लक्ष द्या अशी हेडलाईन छापली होती.या मथळ्यातील बाई हा शब्द बीडमधील भाजप कार्यकर्त्यांना अवमानकारक वाटल्याने त्यानी काल थेट जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लोकाशाविरोधात लेखी तक्रार केली आहे,जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी बोलताना वृत्तपत्रांनी भाषेची सभ्यता पाळली पाहिजे असा उपदेश केला आहे.जिल्हाधिकार्‍यांना भेटलेल्या भाजप शिष्टमंडळात आमदार आरडीदेशमुख,आमदार संगीता ठोंबरे,भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,माजी आमदार केशवराव आंधळे यांच्यासह जिल्हयातील वरिष्ठ भाजप नेत्यांचा समावेश होता. या प्रकाराने बीडचे पत्रकार आणि वृत्तपत्रांचे मालक संतप्त झाले असून हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरच अंकुश आणण्याचा प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.दबाव तंत्राच्या अशा कोणत्याही कृतीला आम्ही घाबरणार नाही असे मत जिल्हयातील पत्रकारांनी व्यक्त केले आहे.आम्ही बीडच्या पत्रकारांसोबत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here