पुणे शहर पत्रकार संघ अध्यक्षपदी निलेश काकरिया,केदार कदम कार्याघ्यक्ष

0
765

“नियुक्ती नव्हे निवडणूक” या धोरणानुसार अगोदर पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुका पार पडल्या.त्यानंतर आता पुणे शहराची निवडणूकही लोकशाही पध्दतीनं अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.जिल्हा संघाची निवडणूक प्रथमच बॅलेट पेपरव्दारे झाली.म्हणजे प्रत्येक सदस्याला घरी मतपत्रिका पाठविल्या गेल्या.त्यांनी मतदान करून त्या परत पाठविल्या.या पध्दतीनं 65 ते 70 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि आपले प्रतिनिधी निवडले.त्यानंतर शहर पत्रकार संघाची निवडणूक मतदान घेऊन झाली.परिषदेच्या घटनेनुसार कार्याघ्यक्ष हाच दोन वर्षांनी अध्यक्ष होत असल्यानं निलेश कांकरिया आता शहराध्यक्ष झाले आहेत.निडणूक कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस आणि कोषाध्यक्षपदासाठी लावली गेली होती.त्यात उपाध्यक्षपद वगळता अन्य पदासाठी काही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.रिंगणात केवळ एकच उमेदवार राहिले.त्यामुळे त्या पदांसाठी बिनविरोध निवड झाली.त्यानुसार केदार कदम हे कार्याध्यक्ष म्हणून ,सागर जगताप सरचिटणीस म्हणून तर जयवंत गंधाले कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध विजयी झाले.उपाध्यक्षपदासाठी काल मतदान झाले त्यात मनोज गायकवड विजयी झाले.विजयी झालेले सर्व पदाधिकारी तरूण आहेत,आणि काम कऱण्याची आवड असणारे,.सामाजिक बांधिलकी जपणारेही आहेत.त्यामुळे पुढील दोन वर्षात शहर पत्रकार संघाचे काम अधिक गतीमान होईल असा विश्‍वास वाटतो आहे.या सर्व तरूण मित्रांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.ही कार्यकारिणी पुढील दोन वर्षांसाठी असेल.लोकशाही पध्दतीनं निवडणुका झाल्याने नेतृत्व कऱण्याची संधी सर्वांना उपलब्ध होऊ शकते हे यातून स्पष्ट झाले आहे.

बाळासाहेब ढसाळ,सूर्यकंत किद्रे आणि सुनील वाळूंज यांनी ही निवडणूक प्रक्रिया चोखपणे तसेच तटस्थपध्दतीनं पार पाडल्याबद्दल त्यानाही धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here