पी.साईनाथ

0
1846

कोण आहेत पी.साईनाथ 

रॅमन मॅगेसेसे पुरस्कार विजेते पत्रकार

पी.साईनाथ 

भारतातील वास्तव आणि शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्‍नावर लेखन करणारे पत्रकार म्हणून पालगुमी साईनाथ यांना संपूर्ण भारत ओळखतो.1957 मध्ये चेन्नईत जन्मलेल्या पी.साईनाथ यांनी ग्रामीण जनतेच्या दुर्दशेचा जवळून अभ्यास केला आणि ग्रामीण विकास आणि ग्रामीण जनतेला भडसावणार्‍या प्रश्‍नांसाठीच त्यांनी आपली लेखणी झिजविली.ग्रामीण जीवनाबद्दलची त्यांची आस्था आणि बांधिलकी विचारात घेऊनच द हिंदू या वृत्तपत्राने ग्रामीण व्यवस्था विभागाचे संपादक म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली.या काळात त्यांनी ग्रामीण जनतेशी निगडीत अनेक बातम्या शोधून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.हिंदू मधून निवृत्त झाल्यानंतर ते मुंबईत स्थाईक झाले असले तरी त्यांनी ग्रामीण जनतेशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही.त्यांनी पिपल्स आर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया ( पारी ) नावाच्या एका कार्यक्रमाची स्थापना केली आहे.यामाध्यमातून ते आपले काम करीत असतात.भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचे ते नातू आहेत.

लेखनाबरोबरच त्यांचे अध्यापनाचे कार्य देखील सुरू आहे,सोफाया पॉलिटेक्निकच्या वृत्तपत्र विद्याशाखेचे व मद्रासमधील एशियन कॉलेज ऑफ जनालिझमचे ते अतिथी संपादक आहेत.दुष्काळ आवडे सर्वांना (   Everybody Loves a Good Drought : Stories from India’s Poorest Districts   ) हे त्यांचे गाजलेले आणि अडचणीच्या काळातील  मानवी मनाचा वेध घेणारे पुस्तक आहे.

पी.साईनाथ यांच्यावर विविध प्रतिष्ठित पुरस्कारांची बरसात झालेली आहे.अलबर्टा विद्यापीठाची डी.लिट,इंडियन एक्स्प्रेस ( दिल्ली ) दि न्यू इंडियन एक्प्रसे ( दक्षिण भारत ) द स्टेटसमन या दैनिकांचे पुरस्कार तसेच टाइम्स ऑफ इंडियाची फेलोशिप त्यांना मिळाली,पीयूसीएलचा ह्यूमन राइट्स जर्नालिझम अ‍ॅवॉर्ड ,प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार,रामनाथ गोयंका पुरस्कार,लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आशियातील नोबेल समजला जाणारा रॅमन मॅगसेेसे अ‍ॅर्वार्डनं ते सन्मानित झालेले आहेत.

मराठी पत्रकार परिषदेचे काम प्रामुख्यानं ग्रामीण भागात चालते,ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शन व्हावे यासाठीच मुद्दाम त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला यावे आणि मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांना केली.त्यांनी ती मान्य केली आणि ते अधिवेशनाचे उद्दघाटक म्हणून 17 तारखेला नांदेडला येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here