पीटीआय या वृत्तसंस्थेनं एका झटक्यात 312 कर्मचार्‍यांच्या हाती

 नारळ दिलंय..यामध्ये पत्रकारेतर कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे.पीटीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेतला गेला.त्याची सूचना लगेच देशभरातील पीटीआय कार्यालयांना दिली गेलीय.पत्रकारेतर कर्मचार्‍यांना नारळ दिला असला तरी पत्रकारांचेही राजीनामे घेऊन त्यांना करार पध्दतीनं कामावर घेतले जाण्याचे संकेत आहेत.या घटनेमुळं पीटीआय कर्मचार्‍यांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी वकिलाशी संपर्क साधला आहे.312 जणांना नारळ का दिला याचं कारण दिलं गेलं नाही.पीटीआय कर्मचार्‍यांच्या समर्थनार्थ देशातील अनेक संघटनापुढे येत आहे.मराठी पत्रकार परिषदेने पीटीआयच्या कामगारांना नारळ देणे अन्याय्य असल्याचे महटले आहे. बीयुजेनेही पीटीआय कर्मचार्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.यामध्ये मुबई कार्यालयातील 14 जणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here