पावसाने रायगडकरांची दाणादाण 

0
667
 

रायगड जिल्हयात गेली चार-पाच दिवस कोसळत असलेल्या पावसाने लोकांची दाणादाण उडवून टाकली आहे.जिल्हयातील सर्व नद्यांना पूर आले असून अंबा नदी कधीही धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी स्थिती आहे.महाडमध्ये सावित्री,काळ आणि गांधारी भरून वाहात आहेत,रोहयात कुंडलिका कोपली आहे,पनवेलमध्ये गाढी,कर्जतमध्ये उल्हास तर रसायनीत पाताळगंगाही भरून वाहात आहेत.पनवेल तालुक्यात किरवली गावात विजेचा शॉक लागून एक मुलगा दगावला असून श्रीवर्धनमध्ये खेकडा पकडण्यासाठी गेलेला एक तरूण पाण्यात वाहून गेला आहे.

सततच्या पावसाने दरडी कोसळण्याच्या अऩेक घटना घडल्या आहेत.नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळल्याने हा रस्ता काल सायंकाळी दोन तास ठप्प होता.पोलादपूर तालुक्यात नावाडे येथेही दरड कोसळण्याची घटना घडली.महाड तालुक्यात कापडे बुद्रुक येथील शाळेत प्रार्थना सुरू असताना एक जुने झाड कोसळल्याने वीस विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.पावसाने पेण आणि म्हसळा एस.टी बस स्थानक जलमय झाले आहे.रायगड जिल्हयात गेल्या 24 तासात 12007.26 मिली मिटर पावसाचे नोंद झाली आहे.सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये 185 .0 मिली मिटर झाला आहे.जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळत आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here