प़चंड उन्हाळा, विजेचा खेळखंडोबा आणि पाणी टंचाईची दिवसागणिक वाढत चाललेली तीव्रता हे आजचे बीड जिल्हयातील चित्र आहे. माझ्या देवडी या गावतही तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सुदैवानं आमच्या वाड्यातील बोअरवेलला मुबलक पाणी अाहे. हे पाणी आम्ही गा़मसथांसाठी उपलब्ध करून दिले आहे. पाण्यासाठी सध्या किमान अधयाॅ किलो मिटर ची रांग लागलेली आहे.. पाण्यासाठी त्राही भगवान झालेल्या जनतेचं दुःख मुंबईला माहिती असण्याची शक्यता नाही. मुंबईतील मेनस्ट्रीम मिडियातही मराठवाडयातील पाणी टंचाईचं वृत्त दिसत नाही हे अधिक दुःखद आहे.. असो दुसर्याला दोष देत बसण्यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे ते करावे या भूमिकेतून माझे प्रयत्न सुरू आहेत. मी माझ्या अधयाॅ गावची तहान भागवू शकतो आहे याचं समाधान नक्कीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here