पनवेल वडाळे तलावात मत्स्यालय उभारणार

0
1135

[divide style=”3″]

fish.jpg1potoपनवेल | वार्ताहर | पनवेल नगरपलिकेने वडाळे तलावात मत्स्यालय उभारण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यामुळे भविष्य काळात पनवेलकरांना पाण्याच्या आतून विविध प्रकारच्या माशांचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
वडाळे तलावात बोगदा खणला जाणार असून अंतर्गत मत्स्यालय उभारण्याची योजना पालिकेने आखली आहे. त्यामुळे पनवेलच्या पर्यटन महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पनवेलमधील वडाळे तलावात हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.
पनवेल शहराला जुना इतिहास आहे. तसेच १८५२ पासून पालिकेचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी पालिका असल्याचे बोलले जाते. यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले की, हा प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केला जाणार आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात येणार आहे. या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here