पनवेल महापालिकेची अधिसूचना जारी 

0
658
पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करणारी अधिसूचना सरकारने काल काढल्याने पनवेल महापालिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.महापालिकेबाबत जनतेने आपल्या हरकती आणि सूचना एक महिन्यात जिल्हाधिकार्‍यांकडे द्यावयाच्या आहेत.हरकती आणि सूचनांची सुनावणी झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकृत घोषणा करण्याबाबत कार्यवाही सुरू होईल.पनवेल महापालिका झाल्यानंतर ती रायगड जिल्हयातील पहिलीच महापालिका ठरणार आहे.त्यामुळं पनवेल शहराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्‍वास नागरिक व्यक्त करतात.नव्या महापालिकेत पनवेल शहर,सिडको विकसित क्षेत्र आणि परिसरातील 68 गावांचा समावेश असेल.पनवेल महापालिका करणे योग्य आहे की नाही,याची माहिती घेण्यासाठी सरकारने विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.त्या समितीच्या सकारात्मक अहवालानंतर सरकारने पुढील कारवाई सुरू केली आहे.
पनवेल नगरपालिका जिल्हयातील एक जुनी नगरपालिका आहे.1852 स्थापन झालेल्या पनवेल पालिका आता जवळपास 164 वर्षानंतर महापिलकेत रूपांतरीत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here