पत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात ,मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार

मुंबईः पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचं विेधेयक याच अधिवेशनात सभागृहात मांडले जाईल या आश्‍वासनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुनरूच्चार केला.त्यामुळे शेवटच्या आठवडयात कायद्याचे विधेयक सभागृहात मांडले जाऊ शकते.

झी-24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर यांना डॉक्टरांनी दिलेली धमकी आणि अर्वाच्च शिविगाळ तसेच भास्करचे प्रतिनिधी विनोद यादव यांना युवक कॉग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने हातपाय तोडण्याची दिलेलया  धमकीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद,विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत सतप्त भावना व्यक्त केल्या.टीव्हीवरील शोमधून एखादी भूमिका मांडली तरी धमक्या दिल्या जात आहेत आणि पत्रकार परिषद एखादा अडचणीचा प्रश्‍न विचारला गेला तरी धमक्या दिल्या जात असल्याने राज्यातील पत्रकारांना काम करणे कठिण झाले आहे त्यामुळं तातडीने कायदा केला जावा अशी स्पष्ट मागणी एस.एम.देशमुख यांनी केली.त्यावर याच अधिवेशनात बिल आणून कायदा करण्याचे अभिवचन मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा दिले.

डॉक्टरांच्या  वाढत्या मजोरीबद्दलही सर्वच पत्रकारांनी आपल्या संतप्त भावना मुख्यमंत्र्यांकडं व्यक्त केल्या.उदय निरगुडकरांनी एखादी भूमिका मांडली असेल तर डॉक्टरांनी सभ्यपणे त्याचा प्रतिवाद करायला हवा.असे न करता झोपडपट्टी दादांना शोभेल अशी भाषा वापरली जावू लागली आहे.उदय निरगुडकर यांच्या पत्नी आणि मुलीबद्दलही असभ्य भाषा वापरली जात असल्याची बाब शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत धमक्या देणार्‍यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करीत या प्रकरणी मी जातीने लक्ष देत असून धमक्या देणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.धुळे येथील ज्या डॉक्टराला मारहाण झाली,त्यानंतरची त्याची भाषा,कृती दाखविणारी एक क्लीप उदय निरगुडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दाखिविली .ती पाहून मुख्यमंत्रीही अचंबित झाले.तसेच विनोद यादव यांना धमकी देणा़र्‍या युवक कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्याविरोधात यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करून घेण्याचे आणि नंतर नियमानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश विले पार्ले पोलिसांना देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख.मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किऱण नाईक ,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर सघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे,कार्यवाह विवेक भावसार,तसेच विनोद जगदाळे.श्रमिक पत्रकार संघाचे यदू जोशी,स्वतः डॉ.उदय निरगुडकर तसेच विनोद यादव आदि उपस्थित होते.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here