सर्व तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाना महत्वाची सूचना

कोरोनानं जगभर हाहःकार उडविलेला आहे.. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात रूग्णाची संख्या सातत्यानं वाढत आहे.. त्यामुळं रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे.. आरोग्यमंत्री राजेश टोपे ही गोष्ट सातत्यानं अधोरेखित करीत आहेत.. अशा स्थितीत पत्रकार संघांना शांत बसता येणार नाही.. माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आणि विनंती आहे की, स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आणि त्यांची अनुमती घेऊन ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताची गरज भागविण्यासाठी प्रयत्न करावेत.. देश कठिण प्रसंगातून जात असताना आपण आपलं योगदान दिलंच पाहिजे असं मला वाटतं.. आपण त्यादृष्टीनं विचार करावा आणि निर्णय घ्यावा अशी विनंती आहे.. विषयाचं गांभीर्य आणि तातडीची गरज लक्षात घेऊन तालुका, जिल्हा संघांनी पुढाकार घेऊन स्थानिक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांना बरोबर घेऊन हा उपक़म राबवावा अशी पुनश्च विनंती आहे.. मी गावाकडं अडकून पडलो आहे.. माझ्या तालुक्यातील आणि जिल्हयातील पत्रकारांशी मी उद्या याबाबत चर्चा करणार आहे..
अर्थात हा सारा उपक्रम राबवताना प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे..
तुमचा
एस. एम.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here