मुंबईः भाजपच्या उमेदवार विजया रहाटकर यांनी माघार घेतल्याने राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे.त्यामुळं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. कॉग्रेसने केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती.कॉग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता ते विजयी होतील अशी शक्यता होती.मात्र भाजपच्या चौथ्या उमेदवाराने माघार घेतल्याने ते बिनविरोध विजयी झाले आहेत.सामनाचे संपादक संजय राऊत सध्या शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आहेत.आता आणखी एक मराठी पत्रकार राज्यसभेत गेल्याने त्यांचे स्वागत केले पाहिजे.कुमार केतकर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. कुमार केतकर यांनी महाराष्ट्र टाइम्स,लोकसत्ता,एकॉनॉमिक्स टाइम्स,दीव्य मराठी आदि वृत्तपत्रांमधून संपादक म्हणून काम केलेले आहे.7 जानेवारी 1946 रोजी त्यांचा जन्म झाला.पत्रकार असले तरी नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशी त्यांची प्रतिमा आहे.भाजप-शिवसेना तसेच नरेंद्र मोंदींचे कट्टर टीकाकार म्हणूनही ते ओळखले जातात.गेली अनेक वर्षे त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती मात्र यावेळेस वयाच्या 72 व्या वर्षी त्यांना खासदार होण्याची संधी मिळाली आहे.इंग्रजी वाहिन्यांवरून कॉग्रेसची बाजू भक्कमपणे मांडणारे केतकर राज्यसभेतही कॉग्रेसची बाजू समर्थपणे मांडतील असे कॉग्रेसला वाटते.राज्यसभेचे खासदार म्हणून केतकर पत्रकारांचे प्रश्‍न सभागृहात मांडतील का हा प्रश्‍न विचारला जातो.आपण तशी आशा करू यात …

पत्रकारितेतून राजकारणात आलेल्यांची मोठी परंपरा आपल्या देशात आहे.मराठीमध्ये विद्याधर गोखले,नारायण आठवले,भारतकुमार राऊत हे ज्येष्ठ पत्रकार खासदार झाले होते.आता संजय राऊत खासदार असून त्यांच्या जोडीला आणखी एक मराठी पत्रकार आता खासदार झाला आहे.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने एस.एम.देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले करून त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here