आत्महत्या केलेल्या पत्रकाराच्या नातेवाईकांना प्रत्येकी

पाच लाख रूपये देण्याचा तीन आरोपींना न्यायालायाचा आदेश 

पत्रकारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून कॉग्रेसच्या एका माजी आमदारासह त्याच्या दोन चमच्यांना अंबाला येथील न्यायालाने प्रत्येकी चार वर्षाची शिक्षा तर ठोठावली आहेच त्याच बरोबर ज्या पंकज खन्ना नावाच्या पत्रकाराला या बदमाशांनी आत्महत्या करायला भाग पाडले त्याच्या नातेवाईकांना तीन आरोपींनी प्रत्येकी पाच लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालाने दिला आहे.शिवाय दहा हजार रूपये दंडही या तिघांना भरावा लागणार आहे.या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे.मात्र हा न्याय मिळविण्यासाठी पंकज नातेवाईकांना तब्बल सात वर्षे प्रतिक्षा करावी लागली आहे.
प्रचलित कायदे देशातील पत्रकारांना न्याय देण्यात कमी पडतात अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे म्हणणे आहे.महाराष्ट्रातही मध्यंतरी माजलगाव न्यायालयाने दिलेला एक निकाल सोडला तर राज्यात पत्रकारावर हल्ला केलाय आणि हल्लेखोरांना शिक्षा झालीय असं उदाहरण सापडत नाही.या पार्श्‍वभूमीवर दिल्लीवरून आलेली ही बातमी नक्कीच स्वागत करावी अशी आहे,
पंकज खन्ना या तरूण पत्रकारानं 10 जून 2009 रोजी आत्महत्या केली होती.आत्महत्येपुर्वी त्यानं लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये कॉग्रेसचे माजी आमदार राम किशन गुर्जर आणि त्यांचे दोन चमचे नामे विजय आणि अजित यांनी माझा अमानुष छळ केल्यानं मी आत्महत्या करीत आहे असे म्हटले होते.या षडयंत्रात स्थानिक पोलिसही सहभागी होते कारण आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी पंकज खन्नावर खोटा गुन्हाही दाखल करून त्याचा छळ केला होता.पंकज खन्नाचे वडिल यशपाल खन्ना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राम किशन यांच्यासह तिघांच्या विरोधात 306 कलमाखाली गुन्हा दाखल केला होता.ही केस अंबालाच्या कोर्टात चालली.त्यात आरोपींना चार वर्षाच्या शिक्षेबरोबरच प्रत्येकी दहा हजार रूपये दंड आणि यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येक आरोपीने मृतांच्या आई-वडिलांना पाच लाख रूपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.गुर्जर यांनी या निकालास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते पण न्यायालाने गुर्जर याचे अपिल फेटाळून लावले आहे.मुख्य आरोपी मोठा पुढारी असल्यानं त्याचं नाव आरोपीच्या यादीतून वगळण्याचा मोठा प्रयत्न झाला.मात्र ते शक्य झालं नाही.जिल्हा न्यायालाविरोधात अपिल उच्च न्यायालानं फेटाळलं असल्यानं तरुगात जाण्यावाचून आरोपी गुर्जरला पर्याय उरला नाही.यात पंकजच्या नातेवाईकाचं कौतूक केलं पाहिजे विविद अडथळ्यांवर मात करीत त्यांनी ही लढाई लढली आणि जिंकली देखील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here