पत्रकाराच्या विरोधात खोटा गुन्हा

0
747

पत्रकारांचे आवाज बंद करण्याचा एक सोपा मार्ग महाराष्ट्रात सध्या सर्रास वापरला जात आहे.पुण्य नगरीचे माहूर येथील प्रतिनिधी सरफराज कादर दोसानी यांच्या बाबतीतही हेच घडलेले आहे.एका गॅस एजन्सीकडू अवैध सिलेंडर विक्री होत असल्याची तक्रार मनसेने दिली.त्याबाबतची बातमी 1 फेब्रुवारीच्या पुण्यनगरीत प्रसिध्द झाली.त्यामुळे चिडलेल्या गॅस एजन्सीच्या चालकाने दोसानी यांच्या विरोधात 6 फेब्रुवारी रोजी खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.पत्रकारांवर हल्ले केले तर त्याना जनतेची सहानुभूती मिळते.या मार्गाने पत्रकारांना बदनाम करून त्याचे खच्चीकरण केले जात आहे.सुदैवाने माहूरच्या घटनेत तेथील सारे पत्रकार दोसानी यांच्या समवेत आहेत.पत्रकार संघटनेने याबाबतचे निवेदन पोलिसांना आणि तहसिलदारांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here