पत्रकार संरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

महाराष्ट्रात लवकरच पत्रकार संरक्षण कायदा लागू होणार


मुंबईः महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.जवळपास अडीच वर्षे राष्ट्रपतींकडं स्वाक्षरीसाठी पडून असलेले पत्रकार संरक्षण कायद्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी अखेर 28 ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली असून ते विधेयक आता राज्यपालांमार्फत मंत्रालयात आलं आहे. त्यामुळं आता पत्रकार संरक्षण कायद्याच्या मार्गाातील सर्व अडथले दूर झाले असून येत्या दोन-चार दिवसात यासंबंधीचे नोटिफिकेशन निघेल आणि हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल.पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे.हा कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली दीर्घकालिन लढा दिला होता.त्यानंतर 7 एप्रिल 2017 रोजी राज्याच्या दोन्ही सभागृहानं कोणतीही चर्चा न करता पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक पारित केलं होतं.त्यानंतर स्वाक्षरीसाठी ते राष्ट्रपतींकडं पाठविण्यात आलं होतं.त्यावर आता स्वाक्षरी झाल्यानं या विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालेलं आहेपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यव विश्‍वस्त एस.एम.देशमुख आणि विश्‍वस्त किरण नाईक यांनी पत्रकारांच्या लढयास मिळालेल्या यशाबद्दल राज्यातील तमाम पत्रकारांचे अभिनंंदन केले आहे.तसेच सरकारला देखील धन्यवाद दिले आहेत.

1 COMMENT

Leave a Reply to Ujwal mahale Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here