पत्रकारांचे 15 मार्चला एसएमएस भडीमार आंदोलन

0
887

पत्रकारांचे 15 मार्चला एसएमएस भडीमार आंदोलन 

पत्रकार पेन्शन आणि पत्रकार सुरक्षा कायद्याच्या मागणीस

सर्वपक्षीय 80 आमदारांचा लेखी पाठिंबा

 मुंबई दिनांक 11 (प्रतिनिधी) पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील पत्रकार येत्या 15 मार्च रोजी ‘एस.एम.एस.भडीमार आंदोलन’ करणार आहेत . .आंदोलनाचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मोबाईलवर पंधरा हजार एस.एम.एस.पाठविण्यात येणार आहेत.एस.एम.एस.च्या माध्यमातून आपला आवाज कारभार्‍यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न होत आहे.त्याचबरोबर पंधरा तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांची समितीच्यावतीने भेट घेतली जाणार असून या भेटीत ज्या 75 आमदारांनी पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा दिला आहे त्या आमदारांची पाठिंबा पत्रे सरकार आणि विरोधी पक्ष नेत्यांना सादर केली जाणार असल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज येथे एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील पत्रकार गेली काही वर्षे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली लढा देत आहेत.मात्र हा प्रश्‍न अजून सुटलेला नाही.या प्रश्‍नांच्या बाबतीत सर्वपक्षीय आमदारांची व्यक्तिगत मतं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी समितीने त्यांना ‘पाठिंबा असेल तर लेखी स्वरूपात पत्रे द्यावीत’ अशी विनंती केली होती.या विनंतीस राज्यातील ८० आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत पत्रकारांच्या दोन्ही मागण्या योग्य असल्याचे सुतोवाच पत्रातून केले आहे.मुख्यमंत्र्यांना उद्देशून त्यांनी लिहिलेल्या पत्रात, ‘चालू अधिवेशनात पत्रकारांचे दोन्ही प्रश्‍न मार्गी लावावेत’ अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा दर्शविणार्‍या आमदारांमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ठ्वादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,माजी मंत्री छगन भुजबळ,जितेंद्र आव्हाड,राज्यमंत्री दादा भुसे,संजय केळकर,प्रताप सरनाईक , राजन साळवी यांच्यासह राज्यातील विधान सभा,विधान परिषदेच्या ८० वर आमदारांचा समावेस आहे . या आमदारांच्या विनंतीचा मान ठेवत सरकारने आता पत्रकारांचा जास्त अंत न बघता कायदा आणि पेन्शनचा विषय याच अधिवेशनात मार्गी लावावा अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

एस.एम.एस.आंदोलन

———————–

पत्रकारांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने ‘एसएमएस भडीमार आंदोलन’ कऱण्यात येत असून 15 मार्च रोजी राज्यातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना सकाळ पासून पंधरा हजारांवर एसएमएस पाठवून आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधतील.समितीच्या वतीने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार होते मात्र सध्याची राज्यातील दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन एसएमएस भडीमार आंदोलनाचा निर्णय समितीने घेतला आहे.राज्यातील पत्रकारांनी एसएमएस पाठवून आपल्या प्रश्‍नाचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यावे असे आवाहनहीसमितीने केले आहे.

पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देणार्‍या आमदार महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देणार्‍या आमदार महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

राज्य मंत्री 

1) मा . ना . श्री . दादा भुसे

2) मा . ना . श्री  दिलीप कांबळे

३)  मा .आं .  श्री रविकांत तुपकर ( महामंडळ )

खासदार      

४) मा . खासदार श्री . चंद्रकांत खैरे ( औरंगाबाद)

५) मा . खासदार श्री .  हेमंत गोडसे ( नाशिक)

६) मा . खासदार श्री .  हऱिश्‍चंद्र चव्हाण ( दिंडोरी )                                                                                ७) मा . खासदार श्री . दिलीप गांधी ( नगर जिल्हा.

८) मा . खासदार श्री . प्रताप जाधव  ( बुलढाणा )

९) मा . खासदार श्री .  चिंतामण वाणगा  (पालघर )

१०) मा . खासदार श्री . अशोक नेते  (गडचीरोली

आमदार 

11) मा . आं . श्री . राधाकृष्ण विखे पाटील      ( विरोधी पक्ष नेते

12 मा . आं . श्री . सुनिल तटकरे    (राष्ट्रवादी अध्यक्ष )

1३) मा . आं . श्री . छगन भुजबळ

१४) मा . आं . श्री . दिलीप वळसे पाटील ( आंबेगाव)

१५) मा . आं . श्री . संजय केळकर

१६) मा . आं . श्री .प्रशांत ठाकू र ( पनवेल )

१७) मा . आं . श्री .सुरेश लाड (कर्जत)

१८) मा . आं . श्री .पांडूरंग महादू बरोरा ( शहापूर )

१९) मा . आं . श्री .शांताराम तुकारा मोऱे ( भिवंडी)

२०) मा . आं . श्री .राहूल कुल ( दौड)

२१) मा . आं . श्री .गोवर्धन शर्मा ( अकोला)

2२) मा . आं . श्री .रणधीर सावरकर ( अकोला पूर्व)

२३)मा . आं . श्री . प्रकाश पाटील भारसाळकर ( अकोट)

२४) मा . आं . श्री .बळीराम सिरसकर ( बाळापूर)

२५) मा . आं . श्री .आमदार गोपीकिसन बजोरिया ( विधान परिषद)

२६) मा . आं . श्री . डी.पी सावंत ( नांदेड)

२७) मा . आं . श्री . हेमंत पाटील ( नांदेड)

२८) मा . आं . श्री . प्रताप पाटील चिखलीकर ( कंधार )

२९) मा . आं . श्री . हर्षवर्धन सपकाळ ( बुलढाणा)

३०) मा . आं . श्री .आनंद राजेंद्र ठाकूर ( डहाणू)

३१) मा . आं . श्री .राजेंद्र साळवी ( राजापूर )

३२) मा . आं . श्री .आ.संजय कदम ( दापोली)

३३) मा . आं . श्री .आमदार देवयाणी फरांदे,

३४) मा . आं . श्री . सदानंद चव्हाण (चिपळूण)

3५)मा . आं . श्री . डॉ.सुधीर भास्कर तांबे

३६)  मा.आ. श्री.  असिफ शेख               ( मालेगाव)

३७) मा . आं . श्री .बाळासाहेब महादू सानप

३८) मा . आं . श्री .अपूर्व प्रशांत हिरे

३९) मा . आं . श्री . हरिष मारोती अप्पा पिंपळे) मुर्तीजापूर

४०) मा . आं . श्री .सुधीर मेघे ( हिंगणे)

४१) मा . आं . श्री .उदय सामंत ( रत्नागिरी)

४२) मा . आं . श्री . राहूल सिध्दविनायक बोंद्रे ( चिखली)

४३) मा . आं . श्री .रविकांत तुपकर ( बुलढाणा जिल्हा)

४४) मा . आं . श्री . संदीपान पाटील भुमरे ( पैठण)

४५) मा . आं . श्री . हितेंद्र ठाकूर

४६) मा . आं . श्री .जे.पी.गावित ( सुरगणा)

४७) मा . आं . श्री . प्रताप सरनाईक ( ठाणे)

४८) मा . आं . श्री . संग्राम थोपटे

४९) मा . आं . श्री .लक्ष्मण पवार ( गेवराई )

५०) मा . आं . श्री .राजाभाऊ वाजे (सिन्नर )

५१) मा . आं . श्री .हरिश्‍चंद्र पवार ( दिंडोरी)

५२) मा . आं . श्री .योगेश बबन घोलप( देवळाली)

५३) मा . आं . श्री .नरहरी वामन शिरवाळ

५४) मा . आं .      सीमा हिरे (नाशिक )

५५) मा . आं . श्री   राजन साळवी,

५६) मा . आं . श्री . योगेश बबनराव घोलप,

५७) मा . आं . श्री .अमित सुभाषराव झनक,

५८) मा . आं . श्री . राहूल पाटील,

5९) मा . आं . श्री ..विजय भांबळे,

6०) मा . आं . श्री ..मधुसुदन केंद्रे,

६१) मा . आं . श्री ..मोहन फड,

६२) मा . आं . श्री ..बाबाजानी दुराणी

६३) मा . आं . श्री . प्रा.डॉ.अपूर्व प्रशांत हिरे,

६४) मा . आं .       निर्मला रमेश गावित,

६५) मा . आं . श्री .बाबुराव काशीनाथराव पाचर्णे,

६६) मा . आं . श्री . सदानंद नारायण चव्हाण

६७) मा . आं . श्री . अमरसिंह पंडित

६८) मा.  आ.  श्री. अनिल कदम                   ( निफाड )

६९) मा . आं . श्री .उन्मेश पाटील (चाळीसगाव)

70) मा . आं . श्री .उदेसिंह पाडवी ( शहदा)

71) मा . आं . श्री .चंद्रकांत रघुवंशी ( नंदूरबार )

72) मा . आं . श्री .  विलास तरे ( भाईसर)

73) मा . आं . श्री .सुरेश नामदेव गोरे

74) मा . आं . श्री .अमित झनक( रिसोड)

75) मा . आं . श्री .आर.टी.देशमुख ( माजलगाव)

76) मा . आं . श्री .संग्राम पाटील

77) मा . आं . श्री .सुभाष भोईर ( कल्याण)

78)  मा . आं . श्री अमित घोडा ( पालघर )

79) मा . आं . श्री .अऱूण जगताप

 80) मा . आं . श्री . पंकज भुजबळ

81) मा . आं . श्री .सुभाष गणू भोईर ( कल्याण)

82) मा . आं . श्री .राजेश क्षीरसागर ( कोल्हापूर उत्तर )

83) मा . आं . श्री .पास्कल धनारे ( डहाणू )

84)  मा . आं . श्री .भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( वैजापूर)

85) मा . आं . श्री .अमल महादेव महाडिक ( कोल्हापूर दक्षिण)

86) मा . आं .       संगीता ठोंबरे ( केज )

87) मा . आं . श्री .भरत गोगावले ( महाड)

88) मा . आं . श्री . महेश किसना लांडगे ( पिंपरीःभोसरी)

89) मा . आं . श्री .धैर्यशील पाटील ( पेण)

90) मा . आं . श्री .गौतम चाबुकस्वार

91) मा . आं . श्री .लक्ष्मण जगताप ( चिंचवड)

92) मा . आं . श्री .संतोष टारफे ( कळमनुरी )

93) मा . आं . श्री .तान्हाजी मुरकुले

94 ) मा . आं . श्री .तुषार गोविंदराव राठोड (मुखेड-कंधार )

95) मा . आं . श्री . देवराव होळी ( गडचिरोली)

96) मा . आं . श्री .) अमर राजूरकर ( नांदेड)

९७) मा . आं . श्री .संदीपान घुमरे ( पैठण)

९८) मा . आं . श्री . क्षितीज ठाकूर

९९) मा . आं . श्री .भीमराव तापकीर ( खडकवासला)

१००)  मा.आ.श्री. दत्तात्रय भरणे ( इंदापूर )

१०१) मा.आ. श्री.  मनोहर गजानन भोईर    ( उरण)

१०२) मा.आ.श्री.  वसंत बळवंत चव्हाण      (नायगाव,नांदेड)

१०३) मा.आ.श्री.  जयवंतराव जाधव          (नाशिक )

१०४) मा,आ.श्री. राहूल दौलतराव आहेर     ( चांदवड-देवळा)

१०५) मा.आ.श्री.चैनसुख संचेती ( मलकापूर ) 

१०6) मा.आ.श्रीमती सुमनताई आर.आर.पाटील (तासगाव)

१०7) मा.आ.श्री.जयकुमार गोरे

१०8) मा.आ.श्री.प्रभाकर देवबा घार्गे

१09) मा.आ.श्री.दीपक प्रल्हाद चव्हाण

११0) मा.आ.जयदेव गायकवाड

११1) मा.आ.श्री। शिवेंद्रसिंह भोसले

११2) मा.आ.श्री.योगेश पुंडलिक टिळेकर ( हडपसर)

 

———————————————————————–

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here