आनंदाची बातमी

ंचंदिगढः एक आनंदाची आणि अन्य राज्यांना दिशा दाखविणारी बातमी पंजाबमधून आली आहे.पंजाब सरकारनं राज्यातील निवृत्त पत्रकारांसाठी चक्क बारा हजार रूपये प्रतिमाह एवढी घवघवीत पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.देशातील 18 राज्यांनी पत्रकार पेन्शन योजना लागू केलेली असली तरी पंजाब हे पहिले असे राज्य आहे की,तेथे पत्रकारांसाठी बारा हजार रूपये पेन्शन दिली जाणार आहे.महाराष्ट्रात अजून निवृत्त पत्रकारांना पेन्शन मिळत नाही.सरकारनं तसा निर्णय घेतला असला तरी तो अंमलात आलेला नाही.पुढील किमान तीन महिने तो अंमलात येण्याची शक्यता नाही कारण पेन्शनची रक्कम किती असावी हेच सरकारनं अजून ठरविलेले नाही.या पार्श्‍वभूमीवर पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारला धन्यवाद द्यायला हवेत की त्यांनी क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.पंजाबमध्ये कॉग्रेसचे सरकार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्यानं दिलेली माहिती अशी,ज्या पत्रकारांचं वय 60 वर्षे आहे,जे पंजाबमध्ये पत्रकारिता करतात आणि ज्यांच्याकडं गेल्या सहा वर्षांपैकी पाच वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे अशा सर्व निवृत पत्रकारांना बारा हजार रूपये प्रतीमाह पेन्शन देण्यात येईल.
ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी पंजाबमधील पत्रकार सातत्यानं करीत होते.पंजाब सरकारनं पत्रकार पेन्शन योजना लागू करण्याचे काही दिवसांपुर्वीच आश्‍वासन दिलं होतं.ते आश्‍वासन पूर्ण करण्यात आलं असून फार जटील नियम न लावता या योजनेचा जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ व्हावा या हेतूने सुलभ नियम केले गेले आहेत..महाराष्ट्र सरकारनं मात्र एवढे जटील नियम केले आहेत की,राज्य सरकारच्या नियमानुसार 200 पत्रकारांना तरी या योजनेचा लाभ होतो की,नाही ते पहावे लागेल.खैर पंजाब सरकारनं मनाचा मोठेपणा दाखवत जो निर्णय घेतला आहे त्याचं मराठी पत्रकार परिषद स्वागत करीत असून मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here