बेंगळुरूः बेंगळुरूमध्ये न्यूज पोर्टलचे संपादक महेश हेगडे याला आज पोलिसांनी अटक केली आहे.महेश हेगडे हे पोस्टकार्ड न्यूज नावाचे पोर्टल चालवितात.त्यांनी आपल्या पोर्टलवर खोटी आणि चिथावणीखोर बातमी टाक्लयाचा त्यांच्यावर आरोप आहे.हेगडे यांच्या अटकेवरून भाजप आणि कॉग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झालंय.महेश हेगडेने आपल्या पोर्टलवरून मुस्लिम तरूणांनी जैन मुनींवर हल्ला केल्याची बातमी व्हायरल केली होती.जखमी मुनींचा फोटो ही त्यांनी बातमीबरोबर व्हायरल केला होता.प्रत्यक्षात हे मुनी अपघातात जखमी झाले होते.ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करीत हेगडे यांना अटक केली.न्यायालयाने हेगडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कर्नाटकमध्ये मे मध्ये निवडणुका होत आहेत.या पार्श्‍वभूमीवर येथील राजकारण गरम बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here