न्या.काटजूंची धडपड व्यर्थ जाणार

0
837

 नवी दिल्ली ( टीम बातमीदार )प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन न्या.मार्कन्डेय काटजू सध्या चर्चेत आहेत त्यांनी भ्रष्ट न्यायाधीशांना मनमोहन सरकारने कसे प्रमोशन दिले,सरकार वाचविण्यासाठी कॅग्रेस सरकारने कशा तडजोडी केल्या याबाबत केलेल्या आरोपंावरून.दहा वर्षांपूर्वीच्या घटनेवर न्या.काटजू आत्ताच का बोलले यामागचं कारण आता बाहेर येत आहे.त्यांना नव्या सरकारशी जुळवून घ्यायचंय अशी चर्चा सुरू झाली आहे.न्या.काटजू खरं तर कॉग्रेस विचारांचे समजले जातात.पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्‌यच्या संदर्भात आम्ही जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी चिडून महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आणि लगेच परतही घेतली.त्यांनी कॉग्रेस शाषित राज्यांवर कधी आरोप केले नाहीत उलट बिहारच्या नितीशकुमार सरकारवर त्यांनी पत्रकारांकडं दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप केले.आता परिस्थिती बदलली आहे आणि त्यांना प्रेस कॅन्सिलचे चेअरमन म्हणून दुसरी टर्म हवी आहे.त्यासाठीच त्यांनी काही दिवसांपुर्वी प्रकाश जावडेकर यांची भेट घएतली होती.त्यानंतर त्यांनी न्यायाधीशांच्या पदोन्नतीबाबचे आरोप केले.कॉग्रेसला अडचणीत आणायचे,नव्या सरकारला खुष करायचे आणि आपली जागा सुरक्षित ठेवायची अशी त्यांची योजना आहे.मात्र पीएमओ त्यांना मुदतवाढ देण्याच्या मनः,स्थितीत नाही.आगामी तीन महिन्यात काटजू याची मुदत संपत आहे.त्यांच्या जागेवर अन्य कोणाची नेमणूक होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here