कोरची येथील दै. देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी राष्ट्रपाल नखाते यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात गडचिरोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची आज २७ एप्रिल रोजी भेट घेऊन हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पत्रकार नखाते यांच्यावर नाहक लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली.
यावर चर्चा करतांना पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकार नखाते यांच्यावर हल्ला करणाNयांवर नविन पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाचा तपास कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्याकडे देण्यात आला आहे.
सदर गुन्हा हा अजामिनपात्र असून चौकशीनंतर आरोपींना अटक करणार असल्याचेही पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पत्रकार नखाते यांच्यावर लावलेले गुन्हे हे अदखलपात्र असल्याचेही पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
नविन पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here