नरेंद्र मोदी उद्या रायगडात

    0
    695

    पंतप्रधान नरेंद्र मोदी  शनिवारी रायगड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. जेएनपीटी उरण येथील सेझ आणि जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरणाचे भूमिपूजन , जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे वितरण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
    उरण तालुक्यातील जसखार, सोनारी, सावरखार आणि करळ या गावातील जेएनपीटीच्या अखत्यारीत असणाऱ्या २७७ हेक्टर परिसरात विशेष आíथक क्षेत्र विकसित केले जाणार आहे. यात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून जवळपास चार हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे; तर या प्रकल्पातून जवळपास दीड लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
    जेएनपीटी प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील दोन हजार ५६३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. यातील दोन हजार ९८ हेक्टर जमीन ही खासगी मालकीची होती. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या तीन हजार ५२४ कुटुंबांना साडेबारा टक्के विकसित भूखंड वितरित केला जाणार आहे. १५८ हेक्टर विकसित भूखंडाचे वितरण या वेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.याशिवाय जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी अंदाचे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. डिसेंबर २०१७ अखेपर्यंत हे रुंदीकरणाचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. या मार्गावरील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजनही नरेंद्र मोदी करणार आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here