धो धो कोसळणार ?

0
912
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असल्याने रायगडसह उत्तर कोकणाला त्याचा फटका बसणार असून सोसाट्याच्या वार्‍यासह जिल्हयात मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.त्याच बरोबर 1 ऑगस्टपासून समुद्रात साडेचार मिटरच्या लाटा उसळणार असल्याने समुद्राच्या काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.सर्व यंत्रणांनाही सतर्क करण्यात आलं आहे.या काळात वार्‍याचा वेग तासी 45 ते 55 किलो मिटर राहणार असल्याने त्यादृष्टीनेही सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.दरम्यान काल दिवसभर आणि आज सकाळीही रायगडच्या अनेक भागात दमदार पाऊस कोसळत आहे.अलिबाग,पेण,रोहा,पाली खालापूर येथे चांगला पाऊस झाला.अलिबागमध्ये गेल्या 24 तासात 27 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यत जिल्हयात 1286 मिली मिटर पावसाची नोंद झालेली आङे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here