देशोन्नतीच्या कार्यालयावर हल्ला

0
1091

भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले.तसेच देशोन्नतीच्या अंकाची होळी केली.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त कार्यालयासमोर असतानाही हा प्रकार घडला.या प्रकारानंतर भंडार ा जिल्हा मराठी पत्रकार संघ,श्रमिक पत्रकार संघाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले.देशोन्नतीवरील या भ्याड हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी निषेध केला आहे.वस्तुतः जी बातमी प्रसिध्द झाली त्यातील आरोप हे आमदार बावनकर यांनी केले होते.त्यामुळे भाजपवाल्यांना निषेध करायचा होता तर तो आमदाराचा करायला ह वा होता.पण तिथं काही चालत नाही म्ङणून त्यांनी सॉफ्ट टार्गेट असलेल्या दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला चढवत आपली मर्दुमकी गाजविली.या प्रकरणी एस.एम.देशमुख यांनी नाना पटोले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपला तीव्र संताप व्यक्त केला,तसेच माध्यमांवरील हल्ल्याचा त्यांच्याकडे निषेधही नोंदविला आहे.

देशोन्नतीचे पत्रकार चेतन भैराम यांच्या जिवितास धोका असल्यानं त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here