पाटणः मराठी पत्रकार परिषद ही लढाऊ पत्रकारांची संघटना आहे.जेव्हा जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्यांचा विषय आला किंवा जेव्हा जेव्हा माध्यमांची मुस्कटदा

बी करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मराठी पत्रकार परिषदेनं तो हाणून पाडला.आणीबाणीत राज्यातील अनेक पत्रकार तुरूंगात गेले होते.त्यानंतर 1982 मध्ये बिहारच्या जगन्नाथ मिश्र सरकारनं जेव्हा माध्यमांची मुस्कटदाबी करणारं विधेयक आणलं तेव्हा मराठी पत्रकार परिषदेचे तेव्हाचे सर्व सभासद चवताळून उठले.सोलापुरात एकवटले.बंदीहुकूम मोडू

न मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला..तेव्हा पोलिसांनी 80 पत्रकारांना अटक केली.या घटनेला 36 वर्षे उलटून गेली आहेत..मात्र ही घटना परिषदेच्या कायम स्मरणात आहे.म्हणूनच 1982 च्या या आंदोलनात तुरूंगात गेलेल्या पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्याचा निर्णय परिषदेनं घेतला.काल पाटण येथील

 मेळाव्यात 1982मध्ये तुरूंगात गेलेल्या बाळासाहेब बडवे,शशिकांत नारकर आणि दिलीप पाठक नारीकर या तीन ज्येष्ठांचा एस.एम.देशमुख आणि मुकेश माचकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.परिषद आपल्या ज्येष्ठांचं कर्तृत्व विसरत नाही,हेच  यातून दिसलं.– 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here