डॉक्टर तुम्ही सुध्दा ?

3
1125

बीडमध्ये सरकारी डॉक्टरांची पत्रकारांना धक्काबुक्की,कोंडून ठेवण्याचा प्रयत्न

शासकीय रूग्णालयात आलेल्या गरीब रूग्णांचे शोषण करून स्वतःच्या तुंबडया भरण्यात मश्गुल असलेले शासकीय रूग्णालयातील डॉक्टर्स किती उन्मत्त बनले आहेत याचा एक किस्सा दोन दिवसांपुर्वी आपण केईएममध्ये एका पत्रकाराच्या वडिलांना मिळालेल्या वागणुकीनेअनुभवला होता .आता बीडमध्ये त्यापेक्षाही संतापजनक घटना समोर आली आहे.

बीडच्या शासकीय रूग्णालयात 16 रूग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया कऱण्यात आली होती.त्यानंतर 16 पैकी 4 रूग्णांना अंधत्व आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला जे जेत पाठविण्यात आले आहे..बीडच्या पत्रकारांनी हे प्रकरण उघडकीस आणले.त्याची चर्चा राज्यभर झाली.त्यामुळे जिल्हा शल्य अधिक्षकांचे पित्त खवळले आणि त्यांनी पत्रकारांना रूग्णालय आवारातच प्रवेश बंदी केली.पत्रकार नाहक(?) रूग्णालयाची बदनामी करीत आहेत असा सीएस बोल्डे आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा आरोप आहे.मात्र बातमीचा फॉलोअप घेणे हे पत्रकाराचे काम असल्याने आज झी-24 तासचे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत रूईकर,सामचे प्रतिनिधी विकास माने तसेच सामनाचे जिल्हा प्रतिनिधी उदय जोशी रूग्णालयात गेले असता नेत्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय पाटील आणि त्याचा सहाय्यक राजू नरवडे यांनी या पत्रकारांना धक्काबुक्की तर केलीच शिवाय त्यांचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला.या उन्मत्त डॉक्टरांनी पत्रकारांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्नही केला.शासनाने नेत्र विभाग बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर होत असताना सीएस आणि नेत्र विभाग प्रमुख मात्र हे सारे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न करीत आहेत .त्यामुळे चित्रिकरण करण्यासही विरोध केला गेला.या संपूर्ण घटनेचा बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश वाघमारे यांनी निषेध केला असून या संबंधीचे निवनेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती बीडमधील या घटनेचा धिक्कार करीत असून या प्रकरणी पत्रकारांना धक्काबुक्की करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे..

3 COMMENTS

  1. Dear Sir,

    I am a Editor of ‘Navi Asha Navi Disha’ magazine. I wish to publish all about journalists who are being threatened on any reason and suppressed by at any cause but kept himself in right way before society. I think, the just and honest journalist is the backbone of our Media.

    In your Udyacha Batmidaar, there are so many news have been publishing of attacking on these persons that I read routinely but can’t publish in my magazine because it can not be copied directly. Mere copying this matter, I can print these sensitive news in a very short period without any change. Because no need to change in it at all.

    So it is requested to arrange to get copied these news directly from website. However, no doubt that it is not ethical to copy a matter directly from the available source but to get wide publicity it should be spread over across the country through all types of medias.

    If you arrange, then I would like to publish in my magazine routinely. Also I would like to mention your website address and other details. Please mail me your response.

    Please do not misunderstand only try to consider the feelings and emotions behind these this.

    Yours’ Sincerely,

    K C Jalgaonkar,
    30, Mahavir Nagar, Parola Distt Jalgaon 425 111

    • माझ्या वेबसाईटवरून माहिती,आकडेवारी कॉपी करून ती स्वतःच्या नावाने वापरून ती काही इंटरनॅशनल वेबसाईटलाही पाठविल्याचे माझ्या निदर्शनास आल्यानंतर बातमीदारवरील मजकूराची कॉपी करता येणार नाही अशी व्यवस्था मी केली आहे.पण आपला हेतू शुध्द असल्याने मी आपणास मजकूर मेल करीत जाईल.किंवा माझ्या ब्लॉगवरही बराच मजकूर अपडेट केलेला असतो.तेथून कॉपी करता येईल.ब्लॉग अ‍ॅड्रेस असा आहे.smdeshmukh.blogspot.in

      • Sir, I was out of station for some days so I could not express sincere thanks.

        I would like to publish your blogs’ contents without any changes in my magazine.

        Again thanks.

        K C Jalgaonkar

Leave a Reply to K C JALGAONKAR Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here